Header Ads Widget

शिक्षा बंदीच्या मृत्यूविषयी माहिती देण्याचे आवाहन

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती मध्यवर्ती कारागृहातील शिक्षा बंदीच्या मृत्यूच्या घटनेविषयी माहितगार व्यक्तींनी माहिती देण्याचे आवाहन अमरावतीचे उपविभागीय दंडाधिकारी तथा चौकशी अधिकारी यांनी केले आहे.शिक्षाबंदी क्र. सी. 184/20, सतिश मांगीलाल राठोड (वय 37), रा. पळसोडा,ता.चांदुरबाजार, जि.अमरावती यांचा दि. 17 जुलै 2020 रोजी सकाळी 7 वाजता अमरावती जिल्हा सामान्य रूग्णालयात मृत्यू झाला.

    या चौकशीत कैदी मयत होण्याचे कारण काय, कैदीचे मृत्यूपूर्व स्वास्थ्य कसे होते, कैदीला मारामारी होऊन मृत्यू झाले किंवा कसे, पोलिसांनी कोणती भूमिका बजावली, वैद्यकीय उपचाराचे कागदपत्रे व व्हिसेरा अहवाल आदी बाबी तपासण्यात येणार आहेत. ज्यांना या घटनेसंबंधी माहिती द्यावयाची आहे, त्यांनी वस्तुस्थितीदर्शक माहिती व आवश्यक कागदपत्रांसह अमरावती उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात 17 जुलैपर्यंत कार्यालयीन वेळेत समक्ष माहिती सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    (छाया : संग्रहित)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या