Header Ads Widget

प्लास्टिक जप्ती व डस्टबिन बाबत मोहिम

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : मा.आयुक्त यांच्‍या आदेशानुसार व वैद्यकीय अधिकारी (स्वच्‍छता) तथा उपायुक्त (सा.) डॉ.सिमा नैताम यांच्या उपस्थितीत व सहाय्यक आयुक्त नरेंद्र वानखडे झोन क्र.२ यांच्या निर्देशानुसार दि.२१/०७/२०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजता मध्‍य झोन क्र.२ राजापेठ अंतर्गत येणाऱ्या शाम चौक, मनपा मुख्य कार्यालय परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन बाबत मोहिम राबविण्‍यात आली.

    आस्थापनाधारक, किरकोळ विक्रेता हॉकर्स, फल फ्रूट विक्रेता यांची तपासणी केली असता तपासणी दरम्यान सर्व आस्थापनांना दोन डस्टबिन ओला व सुका कच-यासाठी वेगवेगळ्या ठेवण्याबाबत सख्त सूचना देण्यात आल्‍या. तसेच १ आस्थापना राधास्वामी जनरल स्टोअर यांना प्लास्टिक गिफ्ट पॅकिंग पन्‍नी, नॉन ओव्हन कॅरीबग वापर करत असल्याचे आढळून आल्याने ५००० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. सदर मोहीमेमध्ये स्वास्‍थ अधिक्षक एकनाथ कुलकर्णी, जेष्‍ठ स्वास्‍थ निरीक्षक विजय बुरे व झोन क्रं.२ चे स्वास्‍थ निरीक्षक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या