Header Ads Widget

ओबीसींच्या सामाजिक,राजकीय नेतृत्वासाठी 'बसपा'च योग्य विचारपीठ !-प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने

    मुंबई : राज्य सरकारचा गलथान कारभार तसेच इतर मागासवर्गीय विरोधी भूमिकेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षणापासून ओबीसी बांधवांना मुकावे लागले.यापूर्वीचे शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस प्रणित महाविकास आघाडी सरकार असो अथवा त्यापूर्वीचे भाजप-शिवसेनेचे सरकार,या दोन्ही सरकारांनी ओबीसी बांधवांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले.ओबीसींनी त्यामुळे बहुजन समाज पार्टीच्या 'विचारपीठा'वर एकत्रित यावे आणि समाजविरोधी राजकीय पक्षांना अद्दल घडवावी,असे आवाहन प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी मंगळवारी केले.

    'बीएसपी के तीन कप्तान, दलित, ओबीसी, मुसलमान' या ब्रीदवाक्याप्रमाणे बसपा स्थापनेपासून काम करीत आली आहे. पक्षाने अगोदरपासूनच काका कालेलकर तसेच मंडल आयोगाचे समर्थन केले आहे.पक्षाचे संस्थापक मान्यवर कांशीराम जी यांनी ओबीसी आंदोलनाला गतिमान केल्याच्या नोंदी आजही इतिहासात सापडतात. ओबीसींना बसपा शिवाय भागीदारी कुणी देवूच शकत नाही.कॉंग्रेस-एनसीपी-शिवसेना-भाजप ओबीसींना निवडणुकांमध्ये तिकिट देतील पंरतु,ते त्यांची भागीदारी सुनिश्चित करू शकत नाहीत.

    मात्र,बसपा ओबीसींना त्यांचा मोठा भाऊ मानते.देशातील एकूण लोकसंख्येत ५२% ओबीसी आहेत.लोकसंख्येच्या तुलनेत त्यांचा राजकीय, नोकरी, शिक्षणासह समाजकारणात सहभाग निश्चित व्हावा ही पार्टीची भूमिका आहे.मान्यवर कांशीराम यांनी ते जिवंत असेपर्यंत यासाठी संघर्ष केला.आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन सुश्री मायावती जी ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी प्रयत्नरत आहेत. त्यामुळे राज्यातील ओबीसी बांधवांनी कॉंग्रेस, एनसीपी, शिवसेना, भाजपच्या मृगजळाला बळी न पडता,बसपात सक्रिय सहभाग नोंदवून आपला सामाजिक,राजकीय वाटा निश्चित करावा, असे आवाहन अँड.ताजने यांनी केले.

    ओबीसींसाठी मा.बहन मायावती जी यांनी वेळोवेळी संसद आणि संसदेबाहेर सुद्धा संघर्ष केला.उत्तर प्रदेशमध्ये बहनजी सत्तेत येताच त्यांनी ओबीसीचे आरक्षण भरून काढले.ओबीचींच्या न्याय हक्काची लढाई सभागृहात मा.बहन मायावतींच्या नेतृत्वात बसपा सोडून कुणीच लढत नाही. कॉंग्रेसने काका कालेलकर यांच्या आयोगाला केराची टोपली दाखवली होती.बसपाच्या पाठिंब्यावर असलेल्या वीपी सरकार ने मंडल आयोग लागू केला. केवळ मान्यवर कांशीराम, मा.बहजींमुळेच हा आयोग लागू झाला. पंरतु,जेव्हा मंडल आयोगासंबंधी आंदोलन सुरू होते तेव्हा लोकांना धार्मिकतेत गुंतवण्यासाठी भाजपने 'कमंडल'यात्रा काढली होती.त्यामुळे जे पक्ष आरक्षण विरोधीच आहेत ते ओबीसींना न्याय कसे देवू शकतील? असा सवाल अँड.ताजने यांनी उपस्थित केला.ओबीसी बांधवांनी या आरक्षण विरोधी पक्षाच्या मोहात न पडता बसपाच्या सहभागी होऊन बहन मायावती जी यांचे हात बळकट करावे,असे आवाहन अँड.ताजने यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या