अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीव्दारे गठित होणाऱ्या महानगरपालिका सदस्य पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत कार्यक्रम राबविण्यात आला असून यात ९८ जागांपैकी २६ जागा नागरिकांचा मागास वर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या.
महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाद्वारे ही आरक्षण सोडत सांस्कृतिक भवन येथे काढण्यात आली. महानगरपालिका आयुक्त डॉ.प्रवीण आष्टीकर, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपायुक्त सुरेश पाटील, नगरसचिव मदन तांबेकर, सहाय्यक निवडणूक अधिकारी अक्षय निलंगे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. सोडत प्रक्रिया अत्यंत पारदर्शक वातावरणात पार पडली. प्रारंभी प्रभागाची नावे नमूद असलेली प्रत्येक चिठ्ठी उपस्थितांना दर्शवून नंतर पारदर्शी डब्यात सर्वांसमोर त्याची सरमिसळ करुन शबनम कौर मंजिल सिंग टांक, युक्ता राजेश उसरेटे, अंश योगेश प्रधान, नैतिक सुनिल धानोरकर मनपा शाळा क्र.१४ वडाळी या शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. महानगरपालिकेच्या सदस्य पदासाठी अनुसूचित जाती व जमातीच्या जागा सोडून उर्वरीत जागांसाठी सोडत काढण्यात आली. ९८ जागांपैकी महिलांना ५० जागा प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती १७ पैकी महिला ९, अनुसूचित जमाती २ पैकी महिला १, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.मा.प्र.) २६ पैकी महिला १३, सर्वसाधारण ५३ पैकी महिला २७ अशा जागांची सोडत निघाली.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या