Header Ads Widget

अन् तिचे ते कष्ट

  आज तिचे ती प्रतिबिंब
  आरश्यात पाहताना, मला
  म्हणते, मला माझ्या
  डोळ्याने दिसत नाहीये
  डोळ्याला पाणी येत होत तिच्या
  आणि तरीही म्हणते मी खचत नाहीये
  पायाला तिच्या त्या
  शेतात जाऊन भयंकर भेगा
  पडल्या आहे पण मात्र
  माझ्या शिक्षणा कडे पाहून
  ती त्या भेगा पडलेल्या पायाला
  माझ्यापासून लपवित आहे
  मी कॉलेज ला जावं
  यासाठी स्वतः भाकर घेऊन जाते
  कधी कधी तर ही माऊली
  शिळच खाऊन जाते
  दुःख सार लपवून
  हसत तरी कशी असेल?
  डोळे पाणावले माझे
  किती त्रास तुला होत असेल
  दुःखाच्या या ओल्या वाटा
  बघणा तुझ्या आसवाने भरल्यात
  बघ ना आई तुझ्या या काभाळ कष्टाने
  तुझ्या मुली क्षणो क्षणी लढल्यात
  लढण्याची हिंमत ही
  बस तुझ्याकडे पाहून येते मला
  तुझ्या डोळ्यातील स्वप्न सारे
  वास्तवात जगायला शिकवते मला
  -प्रतिक्षा मांडवकर
  स्वप्न डोळ्यातले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या