Header Ads Widget

काँग्रेसचे संकेत बोके यांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये प्रवेश

    * राकॉ नेता संजय खोडके यांच्या हस्ते संकेत बोके चा पक्ष प्रवेश
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार यांच्या विचारधारेने युवा वर्ग देशसेवा व जनसेवेकडे प्रेरित होत आहे. त्यामुळे अनेक धडाडीचे युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहे. अशातच काँग्रेस पक्षात शहर व जिल्हा पातळीवर कार्यरत संकेत बोके यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व विभागीय समन्वयक संजय खोडके यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले . राष्टवादीचे अमरावती शहराध्यक्ष प्रशांत डवरे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत यांच्या मार्गदर्शनात संकेत बोके आता राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये सक्रिय काम करणार आहेत. यावेळी माजी महापौर किशोर भाऊ शेळके, योगेश सवई, प्रशांत उर्फ गुड्डू धर्माळे, प्रमोद महल्ले, आकाश हिवसे, शिवम कुंभालकर, प्रतीक भोकरे, श्रेयस पेठे, सुरज अढाळके, राहुल वाघ, सारंग देशमुख, भूषण गोस्वामी, मनीष पेठे, वैभव नागपुरे, तेजस खाडे, अभिजित लोयटे, दीपक खंडारे, आदिल शेख, आदी मान्यवर व सहकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या