Header Ads Widget

पाळा येथे जगतगुरु राजेश्वर माऊली यांच्या उपस्थितीत गुरू पौर्णिमा उत्सव साजरा होणार

    * गुरु पौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र पाळा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन !
    * हजारो भक्तांनी उत्सवामध्ये सहभागी होण्याचे आवाहन !

    मोर्शी : श्री संत सच्चीतानंद बालयोगी राजेश्वर माऊली ट्रस्ट श्री क्षेत्र पाळा यांच्या वतीने आज शुक्रवार दिनांक १५ जुलै रोजी अनंत श्री विभूषित जगतगुरु रामानंदाचार्य स्वामी श्री रामराजेश्वराचार्य समर्थ माऊली सरकार यांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून या उत्सवात सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थानच्या कार्यकारी मंडळातर्फे करण्यात आले आहे.

    गुरु-शिष्य परंपरा फार प्राचीन आहे. आपल्या गुरु बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. जगतगुरु रामराजेश्वराचार्य माऊली सरकार यांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. गुरुपौर्णिमा या दिवसाला आजही अनन्य साधारण महत्व आहे. अनंत श्री विभूषित जगतगुरु रामानंदाचार्य स्वामी श्री रामराजेश्वराचार्य समर्थ माऊली सरकार यांच्यावर श्रध्दा असणारे असंख्य भाविक दरवर्षी गुरुपौर्णिमेला श्री महालक्ष्मी धाम श्री क्षेत्र पाळा येथे येवून जगतगुरु राजेश्वर माऊली सरकार यांचे दर्शन घेतात व या उत्सवास हजेरी लावतात.या वर्षी देखील गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्ताने संस्थानकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

    शुक्रवारी पहाटे पासून कार्यक्रमाना सुरुवात होणार आहे. सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत श्री महालक्ष्मी माता शोडा शोपचार पूजा, सकाळी ११ ते ११:३० पर्यंत अनंत श्री विभूषित जगतगुरु रामानंदाचार्य स्वामी श्री रामराजेश्वराचार्य समर्थ माऊली सरकार यांचे पाद्यपूजन, सकाळी ११ : ३० ते १ वाजेपर्यंत श्री स्वामींचे उदबोधन, दुपारी १ ते २ वाजेपर्यंत श्री स्वामीजींचा दर्शन सोहळा व गुरूदीक्षा समारोह, दुपारी २ ते ४ : ३० महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावर्षाचा हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त मंडळी अथक परिश्रम घेत असून हजारो भक्तांनी गुरु पौर्णिमा उत्सवामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या