बाप माझा ...
मारुनी घामाचे शेतात नांगर,
घेतो मस्तकावरी कर्जाचे भार.
कोरड्या दुष्काळावर करुनी मात,
पिकवे रानात मोती हिरवेगार.
ऊन वाऱ्याचे नसे त्याला भान,
साऱ्या दुनियचा तो घेई घोर,
राजाचा राजा शेतकरी बाप माझा
रोज हिंमतीने राबे नव्या जोश्यात,
कष्टाचे प्रतिक डोले उजाड शेतात.
एका कवितेत मांडू कशी त्याची महती,
नेहमीच मोठी माझ्या बापाची कीर्ती.
0 टिप्पण्या