अमरावती (प्रतिनिधी) : वसुंधरेवर हरित सृष्टी साकारण्याच्या उद्देशाने वृक्षारोपण चळवळीला गतिमान करण्याचा व पर्यावरण संवर्धनासह प्रदूषण मुक्ती व स्थानिक नागरिकांचे आरोग्य निरोगी व अबाधित राखण्यासाठी विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करून कामगार नेते श्री.बी.एन.उपाख्य भाऊरावजी नामदेवराव तायडे यांचा ७२ वा वाढदिवस साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य एस.टी.महामंडळातील सेवा निवृत्त वाहतूक नियंत्रक तथा स्थानिक कपिल वस्तू नगर येथील रहिवाशी जेष्ठ नागरिक,कामगार नेते, श्री. बी. एन. उपाख्य भाऊरावजी नामदेवराव तायडे यांनी सामाजिक कार्यात सक्रिय राहून लोकविकास व समाज प्रबोधनसाठी कार्य कार्य केले. कर्मचारी संघटनेमध्ये सक्रिय राहून कार्मगारांच्या प्रश्नांना वाचा फोडून न्याय दिला. तसेच कपिल वस्तू नगराच्या जडणघडीमध्ये सुद्धा अग्रणी राहून नगर विकासाच्या दृष्टीने विधायक कार्य केले. त्यामुळे वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन करण्याला घेऊन स्थानिक पंचशील युवा मंडळ व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने भव्य वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले.यावेळी मनपाच्या शाळा क्रमांक १७ नजीकच्या मनपाच्या खुल्या प्रांगणामध्ये विविध प्रजातींच्या वृक्षाची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाला मनपा शाळा क्रमांक १७ च्या मुख्याध्यापिका प्रतिभा कोडवते, शिक्षक श्री. बंडू भूयार सर, रिपाईचे किशोर गोसावी, खोब्रागडे रिपब्लिकन पक्षाचे महासचिव सोनोने साहेब, होप फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय भोवते, विष्णू साबळे, राहुल तायडे, माजी पोलीस उप निरीक्षक मुंबई हरिचंद्र गवई, पत्रकार अमित तायडे आदी मान्यवर उपस्थित होते. वाढदिवसाला अवास्तव खर्च टाळून वृक्षारोपणासारखा पर्यावरण पूरक सामाजिक उपक्रम राबवून बी. एन. तायडे यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला असल्याचे गौरवोद्गार मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.आजपर्यंतच्या आपल्या प्रवासात सर्व स्नेहीजण,इष्टमित्र मंडळी, कर्मचारी वृंद व सर्वसमावेशक नागरिकांची भरभरून साथ लाभली आहे. या बद्दल श्री. बी.एन .तायडे यांनी सर्वांप्रती आभार मानीत कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी विनोद गवई, सुधीर भले, राजाभाऊ रायकवार ,मिलिंद तायडे, किशोर सरदार, वसंतराव तंतरपाळे, वच्छलाबाई गवई,अंगणवाडी सेविका प्रमिला धोंगडे, सविता शहापूरे, पार्वती कुकडे, राजकन्या वऱ्हाडे, सुनीता डोईफोडे, श्रीधर कांबळे, रामदास राठोड, किशोर चव्हाण, आदी मान्यवर अतिथीसह स्थानिक नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड करून वसुंधरेवर हरित सृष्टी साकारण्याचा संकल्प केला.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या