मुंबई, : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे महाव्यवस्थापकीय संचालक विवेक भिमनवार यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर शनिवार दि. 23 जुलै व सोमवार दि. 25 जुलै रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. वरिष्ठ सहायक संचालक वर्षा आंधळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीच्या यशात दादासाहेब फाळके चित्रनगरीचे मोलाचे योगदान आहे. मुंबईसारख्या शहरात 521 एकर क्षेत्रावरील या चित्रनगरीत एकाच छताखाली सर्व सुविधा मिळवून देण्यासाठी राज्य शासन विशेष प्रयत्नशील आहे. चित्रनगरीच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम आणि कलात्मक करण्याच्यादृष्टीने कोणते प्रयत्न होत आहेत याविषयी सविस्तर माहिती महाव्यवस्थापकीय संचालक श्री. भिमनवार यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या