Recent in Technology

Advertisement

Breaking News

कैफत

    घात झाला देवा आता
    झाली सारी वाताहात
    तुह्या निसर्गाच्या म्होरं
    झाले हतबल हात !!
    अरे आभायीच्या देवा
    असा कसा तू कोपला
    मासभरा पासून रे
    सूर्य देव तू झाकला !!
    धोधो पावसाचा देवा
    कैसा माजला कहर
    ऊभ्या धरतीचा देवा
    कैसा केला समींदर !!
    रान डूबल डूबल
    पिकं गेलं रे पाण्यात
    कृष्णामाई पूर्णामाय
    कशी धावते रानांत !!
    पशु पक्षी जीव देवा
    सारे झाले सैरभैर
    चोचभर दाण्यासाठी
    भिर भिरती पाखरं !!
    बळीराजा कासावीस
    पोटी ऊपाशी झोपला
    दया मायेचा रे झरा
    तुहा कसा रे आटला !!
    नाही राजाची रे साथ
    निसर्गानं केला घात
    सांग माह्या दैवाची रे
    कुठं मांडू मी कैफत
    वासुदेव महादेवराव खोपडे
    सहा पोलीस उपनिरीक्षक(सेवानिवृत्त)
    अकोला 9923488556

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code