Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

पूर परिस्थिती पाहणीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गडचिरोलीला रवाना

    नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी सव्वाचार वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले. नागपूर व परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने विमानतळावरून रस्ते मार्गाने गडचिरोलीकडे त्यांनी प्रयाण केले.

    तत्पूर्वी विमानतळावर त्यांचे विभागीय आयुक्त माधवी खोडे -चवरे, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सुर्यवंशी, विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अश्वती दोरजे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर ,पोलीस अधीक्षक विजय मगर यांनी स्वागत केले.विभागीय आयुक्त माधवी खोडे चवरे यांनी त्यांना विमानतळावर पूर्व विदर्भातील पूर परिस्थितीचा आढावा दिला. त्यानंतर खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर ऐवजी रस्ते मार्गाने त्यांनी गडचिरोलीकडे प्रयाण केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code