केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर होत नसल्याने, शालेय़ शिक्षण विभागाला अकरावी प्रवेश प्रक्रियेतीअर्जाचा दुसरा टप्पा (भाग दोन भरणे) सुरू करता येत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी आतुर असणारे राज्यातील शेकडो विद्यार्थी 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहेत. दरम्यान, 'सीबीएसई'चा दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर तातडीने भाग दोन भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले असलें तरी विद्यार्थी संभ्रमात असून आपलयाला प्रवेश मिळेल की नाही ? प्रवेश मिळाला तरी आपल्या आवडीचे कॉलेज मिळेल की नाही या विवंचनेत विद्यार्थी आहेत.
राज्य मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर होऊन जवळपास आता जवळपास एक महिना महिना झाला. मात्र, अजूनही अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. कारण राज्य मंडळाचा जरी दहावीचा निकाल जाहीर झाला असला तरी सीबीएसई ,आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर होणे बाकी आहे. त्यामुळे हा निकाल जाहीर झाल्यानंतरच दहावीची पुढील प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी अजून किती दिवस वाट पाहावी लागणार? आणि इतर बोर्डाच्या पाच ते सात टक्के विद्यार्थ्यांसाठी लाखो विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला ब्रेक का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
खरं तर राज्य मंडळाच्या दहावी बोर्डाच्या परीक्षा उशीर होऊनसुद्धा १७ जूनला राज्य मंडळाने दहावीचा निकाल वेळेत लावला. निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच दरवर्षीप्रमाणे अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु होऊन जुलैमध्ये अकरावीचे वर्ग सुरू होतील, असं विद्यार्थ्यांना पालकांना वाटलं. पण मात्र प्रत्यक्षात तसं झालं नाही. जवळपास एक महिना होत आलाय अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे रखडली आहे. सीबीएसई आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या निकालाची प्रतीक्षा याचे कारण आहे. या निकालाची प्रतीक्षा करत राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होऊन सुद्धा जवळपास एक महिना वाया गेला आहे.
दरवर्षी राज्य मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर होण्याआधी सीबीएसई, आयसीएसई बोर्डाचे निकाल जाहीर होतात. मात्र यावर्षी या बोर्डांनी दोन सत्रांत परीक्षा घेतल्याने आणि दुसऱ्या सत्राची परीक्षा एप्रिल-मे महिन्यात घेतल्याने निकाल लांबणीवर गेला आहे. आता हा निकाल जुलै अखेरपर्यंत जाहीर केला जाईल असे सांगण्यात येत आहे. निकालानंतरच अकरावी प्रवेशाचा भाग 2 पूर्ण करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल. कारण सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांना समान संधी प्रवेश प्रक्रियेदरम्यान मिळावी यासाठीच प्रवेश प्रक्रिया तात्पुरती थांबली असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलाय. आता यामध्ये राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचे मात्र नुकसान होत आहे याचा विसर शिक्षण विभागाला पडलेला दिसतोय.
राज्य मंडळाचे दहावीचा निकाल जाहीर झाला असला तरी आणखी काही दिवस विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे अकरावी प्रवेश झाल्यानंतर नवं शैक्षणिक वर्ष सुरू व्हायला ऑगस्ट-सप्टेंबर उजाडणार असे दिसत आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या