- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2022च्या अनुषंगाने पंचायत समिती निर्वाचक गणाकरीता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (स्त्रियांचे आरक्षणासह) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करण्यासाठी आरक्षण सोडत कार्यक्रम जिल्हा व तहसील कार्यालयांत दि. 13 जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता.
तथापि, अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता हा कार्यक्रम स्थगित करण्यात आलेला आहे. तसे पत्र राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले.
0 टिप्पण्या