Header Ads Widget

हर घर तिरंगा अभियानाची बैठक संपन्न

    * १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार अभियान
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : भाजपा कार्यालय अमरावती येथे हर घर तिरंगा अभियानाची नियोजनात्मक बैठक संपन्न झाली.बैठकीला हर घर तिरंगा अभियानाचे संयोजक आमदार योगेश सागर,भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी,आमदार प्रताप अडसड यांनी संबोधित केले.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असून आपला राष्ट्रध्वजाप्रती असलेला सन्मान, राष्ट्रीयत्वाची भावना आणि बंधुभाव वाढावा व स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसेनानींचा संघर्ष आजच्या पिढ्यांना अवगत व्हावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा अभियान सुरू केले आहे.

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हे अभियान १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक नागरिकाने या अभियानात सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.जिल्हा महामंत्री प्रशांत शेगोकार,प्रवीण तायडे,राजेश पाठक, माजी आमदार रमेश बुंदीले अंजनगावसुर्जी माजी नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे शेंदुरजना घाट नगराध्यक्ष रूपेश मांडवे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या