Recent in Technology

Advertisement

Breaking News

मी माणसातला माणूस शोधतेय...

    आजच्या या धावपळीच्या जगात कुणालाच कुणासाठी वेळ नसतो. प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त आहेत. असं म्हणतात की, माणुसकी च्या वाटेवर माणुसकीचे इमान पेरा, माणसं पेरून माणसाच पीक घेणार कवी माणसातला माणूस शोधत स्वतः च हरवून गेला. वरवर वाटणारा माणूस, हा माणूस नसतोच. या जगात कुणावर विश्वास टाकावा? कुणाला माझं म्हणावं हे मला अजूनपर्यंत कळलंच नाही..मी आज पर्यंत खूप जणांना जीव लावला, पण कुणी आपलं झालं नाही. कुणी कुणाचं नसतं, हे ज्याचं त्याला कोड असतं. हे आपल्यालाच सोडवायचा असतं. म्हणून स्वतः चा दुःखात स्वतः ला सावरायला शिकलं पाहिजे. आयुष्य म्हणजे ' या मातीत जन्म घेणे आणि या मातीमध्येच मिटून जाणे'....

    काय करायचं माहिती नाही. वाट सापडत नाहीयेत, आयुष्य आहे जगायचं आहे, पण कसं जगायचं माहिती नाही, कोणासाठी जगायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न?? असं वाटतं की, माणसान हसून जगावं, कारण की हसून जगताचं येत नाही जीवनात. शेवटी जाताना सर्वजण रडतात. आयुष्य आपलं आहे जपलं तर पाहिजे ना...आपल्या जीवनामध्ये दुःखाच एकच औषध आहे ते म्हणजे प्रेम....

    आजच्या या जीवनामध्ये प्रेम भेटणं ही खूप मोठी गोष्ट आहे...आजकालच्या जीवनात विश्वास कुणावर ठेवावा तेच समजत नाहीये...आणि प्रेम तर खूप लांबची गोष्ट आहे...आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात माणुसकी हरपत चालली आहे. माणसं आहेत पण माणुसकी नाही, जीव आहे पण जिव्हाळा नाही. प्रेम आहे पण आपलेपणा नाही....आजच्या या काळात मला माझ्याच माणसातील माणूस सापडत नाहीये.... माणसं खूप आहेत पण आपलं कोण आहे माहिती नाही...

    -भाग्यश्री घुरघुरे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code