Header Ads Widget

राष्ट्रवादी युवक काँग्रेस वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ

    * हरित अमरावती साकारण्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा संकल्प
    * कठोरा रोड स्थित नारायण नगर-बालाजी नगर येथून वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ
    * रायुकॉ शहराध्यक्ष ऋतुराज राऊत यांचा पुढाकार
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : नुकतीच पावसाळ्याला सुरुवात झाली असून जनजीवन सुखावण्या बरोबरच निसर्गही बहरला आहे. या दिवसात वृक्षारोपण करणे उपयुक्त असून धरतीवर हरित सृष्टी साकारण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रदूषण मुक्ती, ऑक्सिजन युक्त हवा तसेच नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने भव्य वृक्ष लागवड अभियान राबविण्यात येत आहे.

    रविवारी कठोरा रोड स्थित नागरायण नगर- बालाजी नगर येथे वृक्षारोपण करून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत डवरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमाला राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश हिवसे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महासचिव सुयोग ढोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर संघटक सागर इंगळे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा तसेच मोकळ्या जागेमध्ये विविध प्रजातींच्या वृक्षाची लागवड करण्यात आली. अमरावतीचा विस्तार झपाट्याने होत असल्याने व वाढत्या शहरीकरणासाठी वृक्षतोड झाल्याने निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे.

    वाढते प्रदूषण व सूर्याच्या अतिनील किरणांमुळे ओझोन चा थर कमी होत असल्याने ग्लोबल वार्मिंक चा धोका निर्माण झाला आहे. अशा धोकादायक परिस्थिती पासून सुरक्षा व्हावी व नागरिकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहावे यासाठी आता वृक्षारोपण अभियान राबविणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत डवरे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांच्या मागर्दशनात अमरावती शहरात हरित सृष्टी साकारण्यासाठी वृक्षारोपणाचा विधायक उपक्रम हाती घेण्यात आला असून शहरात विविध ठिकाणी, रस्त्यांचे दुतर्फा तसेच मोकळ्या मैदानात वृक्षारोपण करून अमरावतीत हरित सृष्टी साकारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या अभियानात नागरिकांनी सुद्धा सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनाची कास धरावी असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत यांनी केले . यावेळी राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महासचिव सुयोग ढोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर संघटक सागर इंगळे, परिसरातील प्रतिष्ठित नागरिक राजेश श्रीखंडे, चंद्रकांत ताथोडे, डॉ. धनराज चक्रे, वैभव मोरे, रोशन आवारे, स्वप्निल धोटे, मोहित काळमेघ, निलेश साबळे, योगेश आरंकर आधी युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या