अमरावती (प्रतिनिधी) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रमात सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेल्या मातंग समाज व तत्सम बारा पोटजातीतील विद्यार्थी, विद्यार्थींनींना शिष्यवृत्ती दिले जाते. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पात्र विद्यार्थ्यांनी आपला अर्ज जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, शिधापत्रिका, आधारपत्र, दोन छायाचित्रे, गुणपत्रिका व पुढील वर्गात प्रवेश घेतल्याबाबतचा बोनाफाईड प्रमाणपत्र जोडून दि. 21 जुलैपर्यंत जिल्हा व्यवस्थापक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, अमरावती येथे दोन प्रतीत सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या