अमरावती (प्रतिनिधी) : आषाढी वारीसाठी संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी पंढरपूर येथे दर्शनासाठी येत असतात. पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक स्टीकर्स उपलब्ध करून देणे आदी बाबींचे पालन परिवहन विभाग, वाहतूक पोलीस यांनी समन्वय ठेवून त्याची काटेकोरपणे करावे, असे निर्देश जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत.
टोल माफी सुविधेचा वारकऱ्यांना लाभ होण्यासाठी वारकऱ्यांच्या वाहनांवर स्टिकर्स लावण्यात येणार आहेत. तसे स्टीकर्स परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, आरटीओ कार्यालय यांनी समन्वय ठेवून उपलब्ध करून द्यावेत. सर्व पोलीस ठाणी, वाहतूक पोलीस चौक्या, आरटीओ कार्यालये येथे स्टीकर्स उपलब्ध असावेत. पंढरपूरला जातेवेळी व परत पंढरपूरहून येतेवेळी दि. 7 ते दि. 15 जुलैदरम्यान ही सवलत पालख्या, भाविक व वारक-यांच्या हलक्या व जड वाहनांसाठी दिली जाणार आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या