अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती शहरातील दस्तूर नगरमध्ये सुरु करण्यात आलेल्या डीसीबी बँकेच्या नव्या शाखेद्वारे जास्तीत जास्त सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक, छोटे व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांना बँकिंग सेवासुविधा उपलब्ध करवून देण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्हाधिकारी पवनीत कौर तसेच पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बँकेतील वरिष्ठ अधिकारी ॲग्री अँड इन्क्लुसिव्ह बँकिंग विभागाचे क्षेत्रीय प्रमुख आनंद कलकोंडे तसेच बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.
डीसीबी बँकेच्या या शाखेमध्ये ग्राहकांना अनेक वेगवेगळ्या रिटेल बँकिंग सेवांचा लाभ घेता येईल. सर्व आकारांचे लॉकर्स, बचत खाते, चालू खाते, मुदत ठेव आणि विविध प्रकारच्या कर्ज योजना अशा अनेक वेगवेगळ्या सेवासुविधा उपलब्ध आहेत. व्यक्ती, शेतकरी, शेतकी व्यवसाय तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग या बँकिंग सेवांचा लाभ घेऊ शकतील. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक याबँकेमध्ये व्यवसाय कर्ज मिळवू शकतील. ट्रॅक्टरसाठी कर्ज, किसान क्रेडिट कार्ड, शैक्षणिक संस्थांसाठी कर्ज, बांधकाम व्यावसायिकांना बांधकामासाठी आर्थिक साहाय्य तसेच इन्व्हेंटरी फंडिंग या योजना येथे उपलब्ध आहेत.
खाजगी क्षेत्रातील डीसीबी बँक लिमिटेड ही भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत नियंत्रित केली जाणारी अनुसूचित वाणिज्य बँक आहे. या बँकेचे व्यवस्थापन आणि प्रशासन अतिशय व्यावसायिक पद्धतीने केले जाते. आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सोयीसुविधांनी सुसज्ज असलेल्या डीसीबी बँकेकडे आधुनिक एटीएम्स, वैयक्तिक तसेच व्यवसाय बँकिंग ग्राहकांसाठी इंटरनेट बँकिंग सुविधा व मोबाईल बँकिंग ॲप आहेत.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या