* चांगल्या कार्याचा अविस्मरणीय दाखला
प्रतिनिधी
सुनील शिरपुरे/झरीजामणी
झरीजामणी तालुक्यातील जामणी येथील छोट्याशा गावात श्री गणेश शामराव मुके यांचे वास्तव्य असून सध्या ते मांगली ग्रामपंचायतला कार्यरत आहे. सन २०२०-२०२१ मध्ये त्यांनी केलेले अनेक कामकाज विचारात घेऊन पंचायत विभाग जिल्हा परिषद यवतमाळ कडून त्यांची आदर्श ग्रामसेवक पुरस्काराकरीता निवड करण्यात आली. हा पुरस्कार सोहळा आज दि. २७ जुले २०२२ रोजी स्व.वसंतराव नाईक सभागृह जिल्हा परिषद यवतमाळ येथे पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला त्यांना सपत्नीक कुटूंबासह उपस्थिती दर्शविण्यास सांगण्यात आले. जिल्हाधिकारी साहेब व मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्या हस्ते मिळालेला हा पुरस्कार त्यांच्यासाठी चांगल्या कामाचा मिळालेला एक दाखला असून त्यांच्या जीवनातील एक अनमोल क्षण आहे. हा अविस्मरणीय क्षण डोळ्यापुढे ठेवून ते भविष्यात देखील असेच उत्तम कार्य करतील यात काही वाद नाही. त्यामुळे भविष्यातही त्यांचे चांगल्या कामात व इतर अनेक उपक्रमात असेच योगदान राहील हे निश्चित. चांगल्या कामाची कधी ना कधी व कुठे ना कुठे दखल घेतल्या जातेच हे यावरून स्पष्ट दिसून येते. काही मोजकेच ग्रामसेवक व इतर कर्मचारी असे चांगले कार्य करतांना बघायला मिळते.
0 टिप्पण्या