मेघ नभात दाटले
जल पाखाली वाहून
पोट नभाचे फाटले !!
आला पाऊस पाऊस
कसा धाराधारातून
कासावीस रे छप्पर
नदी वाहे दारातून !!
वाजे ढगांचा नगारा
नाचे वीज तालावर
तिच्या पायीचे पैंजण
कसा छेडीती झंकार !!
आल्या पावसाच्या धारा
त्याचा तालसुर न्यारा
कसा निसर्ग छेडीतो
सप्तसुरांच्या रे तारा !!
लखलखाट विजेचा
कैसे पेटले आकाश
उजळल्या दाही दिशा
झाला प्रकाश प्रकाश !!
दाह शमला शमला
तृप्त झाली वसुंधरा
भुई नभाच मिलन
कसे चुंबती अधरा !!
- वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक(सेवानिवृत्त)
अकोला 9923488556
0 टिप्पण्या