मुंबई, दि. 15 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र ’ या कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. निवेदक श्रीमती मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे. रविवार, दि. 17 जुलै 2022 रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील समाजमाध्यम लिंकवर पाहता येईल.
यू ट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR
देशात दि. 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होत असून ही निवडणूक कशी घेतली जाते, मतांचे मूल्य म्हणजे काय, या निवडणुकीमध्ये सहभागी यंत्रणा तसेच मतदान पेटीचा विमान प्रवास याविषयी सविस्तर माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या