अमरावती (प्रतिनिधी) : विदर्भाचं नंदनवन असलेल्या अतिदुर्गम भागातील आदिवासींसाठी शासनाची कुठलीही मदत न घेता दानशूर व्यक्तीच्या माध्यमातून प्रदीप बाजड यांनी मेळघाटातील गरजवंत गावांना दत्तक घेऊन सुजलाम-सुफलाम करण्याचा मानस हाती घेतला आहे. आता त्याची संकल्पना हि अस्तिवात पाहायला सुरवात झाली आहे. खास म्हणजे आधारकडून अविरत कपडे व जिवणापयोगी वस्तुंच्या वाटपाचे काम जवळपास मागील ६ वर्षापासून अविरत सुरु आहे. मेळघाटात जवळपास आतापर्यंत शेकडो गावांना आधार फाउंडेशनने मदतीचा आधार देत सर्वोतोपरी मदत केली, आणि सध्या हि मदतीचं कार्य जोमाने सुरुच आहे... एवढचं काय आधार फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वानुमते मेलाघाटातील भूलोरी गावं हे 3 वर्षासाठी दस्तक घेतले. आधारच्या पुढाकारातून मेळघाटातील भूलोरी गावाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी दानशुरांनी मदत हि द्यायला सुरवात केली आहे, “आधार”ची आदर्श दत्तक गाव संकल्पना प्रत्येक्षात अनुभवायला मिळते आहे. त्यामुळे आपल्या अंगी असलेल्या सर्वांगीण कला, गुण, कौशल्य, व आपल्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण अनुभवाचा वाटा सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या गरजु-गरीब आदिवासी गावातील नागरिकांसाठी सहकार्येच्या अपेक्षेतून आनंद घ्यावा असे आवाहन आधार फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
चहूबाजूने हिरवा शालु नेसलेला सातपुडा, खळखळून वाहणारा झरा, मध्येच पर्वतावर जमा झालेली ढगांची गर्दी, हळुच भुरभुरणारा पाऊस, खिनभर मोकळे झालेले आकाश आणि तेथील आदिवासी मंडळीत असलेली मायेची ऊब. अग्नि, जल, वायु, आकाश व पृथ्वी तत्वाचे मिलन एकाच जागी होतांना पाहणे, हा दुर्मिळ योग आधार फाऊंडेशन, अमरावतीच्या वतीने दत्तक घेण्यात आलेल्या भुलोरी गावाने आकर्षित केलं, मोहीत केलं. विशेष म्हणजे आधार तर्फे तीन वर्ष विकास कामे करण्यासाठी या समाजसेवी प्रकल्पाला ग्रामपंचायतमध्ये अधिकृत ठराव घेऊन आधार फाऊंडेशनला लोकसहभागातून गावाच्या विकासासाठी मान्यता देण्यात आली, तसेच 'भुलोरी' गावाचा आधार गावं दत्तक उदघाटन सोहळा २४ जुलै रोजी गावकरी, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यादरम्यान भुलोरी गावाकडे येणाऱ्या रस्ताच्या दुतर्फा भागात विविध १०० पेक्षा अधिक फळझाडांचे वृक्षारोपन करून गावकऱ्यांच्या हस्ते ट्री गार्ड लावण्यात आले. त्यावेळी उपस्थितांनी पावसाची तमा न बाळगता अक्षरशः चिखलात पुरुषांबरोबरच स्त्रियांचा सहभाग म्हणजे त्यांच्यात आदिवासी बांधवा बद्दल असलेला जिव्हाळा ओतप्रोत भरून पाहायला मिळाला.
आदिवासी बांधवांना मदत करावी, असे प्रत्येकाला वाटते, परंतू त्यांच्यापर्यंत पोहोचावे कसे, हे सर्वसामान्यांना सहज शक्य नसते. त्यासाठी सामाजिक कार्य करणाऱ्या नेतृत्वाची गरज असते. नेता हा सर्वसामान्यामधून असला व त्याला असलेली सामाजिक कामाची तळमळ तसेच सर्वांना सोबत घेऊन काम करण्यात जो आनंद मिळतो असं नेतृत्व प्रदीप बाजड यांच्या रुपाने आधार फाऊंडेशनला लाभलं म्हणावं लागेल.. आधार फाऊंडेशन गेल्या सहा वर्षापासून अविरत आदिवासीं बांधवांच्या संपर्कात असून सर्वसाधारण आपल्याला उपयोगी नसलेल्या वस्तू जसे - वस्त्र, भांडी, लहान मुलांची खेळणी समाजाकडून जमा करुन त्याचा वाटप मेळघाटातील आदिवासी मंडळीना करतात. आता तर आधार फाऊंडेशन ने "भुलोरी" हे गाव दत्तक घेऊन समाजातील दुर्लक्षित घटकाला सक्षम करण्याचा विडाच उचलला आहे. शिक्षणाशिवाय गावाची प्रगती होणे शक्य नाही हे 'आधार' ने सर्व प्रथम हेरलं. आधार फाऊंडेशने स्थानिक शिक्षकांशी सल्लामसलत केल्यावर विद्यार्थांजवळ पुस्तकं तर आहेत, परंतु शिक्षणास लागणारे साहित्य जसे-वह्या, पेन्सिल, कंपास इत्यादी त्यांच्याकडे नाहीत. असे कळल्यावर, वर्ग पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्यांचा वाटप अभियंता जीवन सदार यांचे प्रमुख उपस्थितीत, मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आला. गावातील जिल्हा परीषदेच्या शाळेतील बालवाडीच्या बच्चेकंपनीसहित वर्ग पहिला ते चौथ्या वर्गातील विध्यार्थ्यांना पाटी, लेखन, पेन-पेन्सिल व बाँडबुक आणी पाचवी ते आठव्या वर्गातील सर्व विध्यार्थ्यांना बाँडबुक व कंम्पाँसचे वाटप दानशूर लोकांच्या मदतीने करण्यात आले.
भुलोरी गावात प्रामुख्याने समस्या जाणवते ती पाण्याची. माहे एप्रिल, मे, जून मध्ये विहीरीतील पाण्याचा साठा संपतो व नागरिकांना लांबून पाणी आणावे लागते. शासनाने गावातील पाण्याचा साठा वाढावा म्हणून प्रयत्न केलेले आहेत, परंतु खाली काळा पाषाण असल्याने तेथे उन्हाळ्यात पुरेल असा पाण्याचा स्रोत भूगर्भातून दिसुन आला नाही. त्यामुळे आधार फाऊंडेशन ने भुलोरी गाव जलमय कसं होईल या करीता विश्वकर्मा निवृऱ्त अभियंता बहुउद्देशीय सह.संस्था अमरावती यांना मार्गदर्शन करण्याकरिता आमंत्रित केले होते. सतत पाऊस सुरू असल्यामुळे , वि.नि.अ.ब.स.संस्थेची चमू प्राथमिक सर्वेक्षण करु शकली नाही. तरी पावसाळ्यात पडणारे पावसाचे पाणी, विपुल प्रमाणात साठा करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे संस्थेचे चमुस वाटते. विश्वकर्मा निवृऱ्त अभियंता बहुउद्देशीय सह.संस्था मर्यादित, अमरावती चे अध्यक्ष व्ही.टी.इंगोले व सचिव अभियंता विठ्ठल सांगे, सदस्य अभियंता रामधन कराळे व अभियंता किशोर फुटाणे यांनी याप्रसंगी भुलोरी गावासाठी पाणी साठा उपलब्ध व्हावा म्हणून पाण्याचा स्रोत शोधण्यास लागणारी तांत्रिक मदत विनामुल्य संस्था करेल असे आश्वासन देत गावकऱ्यांच्या आनंदात भर पाडली. त्याकारणाने आधार फाऊंडेशन, अमरावती यांनी दत्तक घेतलेल्या मेळघाटातील "भुलोरी" ह्या गावाचा येत्या तीन वर्षात निश्चितच कायापालट होईल यात शंकाच नाही.
स्वातंत्र्य दिन १५ आँगष्ट निमित्त शाळेतील विध्यार्थ्यांना स्कूलबँग व संपूर्ण गावात स्वच्छता अभियान राबविण्याचा निश्चय दत्तक गाव योजना प्रकल्प प्रमुख वसंतराव भाकरे यांनी जाहीर केला. या उपक्रमाला जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, सौ.कडू, जिवन सदार, सरपंच साबुलाल बेढे, डॉ. सुधिर बाजड, विद्याधर इंगोले, फुटाने साहेब, सांगे साहेब, मोहोड साहेब, प्रा.सुर्यकांत बाजड, पुरुषोत्तम कडू, निभोरकर साहेब, जळमकर साहेब, डि.आर.राणे, संजय खर्चे, सतिश क्षिरसागर, विजय महाजन, राजाभाऊ ढिगवार, दिलीप काकडे, अँड.राहूल बानुवाकोडे, जाधव सर, प्रकाशराव बाराहाते, अनिल मेश्राम, आशिष ठाकरे, अरविंद विंचुरकर, प्रा.अनंत ठाकरे, दिलीप हटवार, तायडे साहेब, डॉ.अनिल ढवळे, दत्तक गाव योजना प्रकल्प प्रमुख वसंतराव भाकरे, डॉ. सहदेवराव पाटील, प्रदीप बाजड, दादाराव काळे, प्रा.अंनत बाजड, सुनिल फुसे, उमेश बानुवाकोडे, दिपक खडेकार, निषजी हिरोडे, संजय राऊत, प्रविण मोंढे, महेंद्र शेंडे, सौ.विंचुरकर, सौ. वैशाली बाजड, सौ.शेंडे, सौ.ढिगवार, सौ.सदार, सौ.खर्चे, सौ.राऊत, सौ.फुसे, सौ.महाजन, डॉ.उल्काताई वाडेकर, यांच्यासह आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते.
मेळघाट म्हटलं तर आपलं वैभव, प्रत्येकाकडे कुठल्या न कुठल्या रुपात कला, गुण आहेच, मग त्याला आता प्रत्यक्षात अनुभवायची गरज आपली आहे, त्यासाठी प्रत्येकांनी पुढाकारात सहभागी व्हावं, त्यातून आपण भूलोरीला विकासाच्या दृष्टीने जगाच्या पाठीवर आदर्श करूया, यासाठी महत्वाची बाब म्हणजे मेहनतीसोबतच आर्थिक उलाढाल हि तितक्याच महत्वाची आहे, म्हणून माझ्या दानशुर नागरिकांनी फुल नव्हे तर फुलाची पाकळी देत मदतीचा हात पुढ करावा असे आवाहन आधार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप बाजड यांनी केले.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या