- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती शासनाच्या निपुण भारत या महत्वाकांक्षी अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी या करिता जिल्हा प्रकल्प सनियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हे निपुण भारत अभियानांतर्गत अभियान संचालक आहेत. श्री अविश्यांत पंडा, अध्यक्ष जिल्हा सनियंत्रण कक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती यांचे अध्यक्षतेमध्ये जिल्हा प्रकल्प सनियंत्रण कक्षाची सभा दिनांक १८ जुलै रोजी जिल्हा परिषद सभागृह यथे संपन्न झाली. या प्रसंगी जिल्हा सनियंत्रण कक्षाचे सदस्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील सर्व अधिकारी – कर्मचारी तसेच शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद येथील अधिकारी व सर्व गट शिक्षणाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी मिलिंद कुबडे, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अमरावती तथा सचिव जिल्हा प्रकल्प सनियंत्रण कक्ष यांनी प्रास्ताविक करून तसेच निपुण भारत अभियानाची उद्दिष्टे तसेच जिल्हा प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या कर्तव्य व जबाबदारी यांचा उल्लेख करून सभेची पुढील कार्यवाही विषद केली. त्यानंतर निपुण भारत अंतर्गत राबविल्या गेलेल्या शाळा पूर्व तयारी अभियानाची जिल्ह्यातील अंमलबजावणी कशा प्रकारे झाली याचे तसेच सदर अभियानाची परिणामकारकता काय दिसून आली या बाबीचे सादरीकरण दीपक चांदुरे, अधिव्याख्याता यांनी केले. तसेच त्यांनी निपुण भारत अंतर्गत सध्या राबविण्यात येत असलेल्या विद्याप्रवेश या कार्यकमाची माहिती सभागृहास दिली.
या प्रसंगी सेतू अभ्यासक्रम बाबत रामभाऊ सोनारे, अधिव्याख्याता यांनी तर शाळा भेटींचे विश्लेषणात्मक सादरीकरण पवन मानकर, अधिव्याख्याता यांनी केले. NAS २०२१ मध्ये अमरावती जिल्ह्याची स्थिती दर्शक सादरीकरण करण्यात प्रशांत डवरे, जेष्ठ अधिव्याख्याता यांनी केले. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुरु असलेल्या कार्यक्रमांबाबत समाधान व्यक्त केले. तसेच NAS २०२५ च्या करिता उद्दिष्ट निर्धारित करून कालबद्ध पद्धतीने कार्यक्रम राबविण्याचे निर्देश दिले. तसेच जिल्हा परिषद अमरावतीद्वारा जिल्ह्यातील १४ तालुक्यातील दत्तक ४१ शाळांसंबंधी गुणवत्ता सर्वेक्षण कार्यक्रम हाती घेऊन नियोजन सादर करण्याचे निर्देश दिले. सभेच्या शेवटी आभार प्रदर्शन प्रवीण राठोड यांनी केले.
0 टिप्पण्या