Recent in Technology

Advertisement

Breaking News

अस्मानी वृत्तपत्र संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी आप्पासाहेब पाटील यांची निवड

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    सांगली : अस्मानी अर्थात असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मेडीयम न्यूजपेपर ऑफ इंडिया या राष्ट्रीय वृत्तपत्र संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर सांगलीचे जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. ही निवड राष्ट्रीय अध्यक्ष श्री केशवदत्त चंडोला यांनी केली आहे.

    यापूर्वी श्री आप्पासाहेब पाटील हे संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदावर सन 2011 पासून कार्यरत होते. या काळात राज्यातील अनेक वृत्तपत्रे व पत्रकारांच्या समस्यांचे समाधान त्यांच्या अथक प्रयत्नातून झालेले आहे. तसेच या संघटनेवर त्यांनी नॅशनल कौन्सिल मेंबर म्हणून काम केले आहे. श्री अप्पासाहेब पाटील दैनिक लक्ष्मीपुत्र कराडचे मानद संपादक, मासिक अवनी विकास जागरचे मार्गदर्शक संपादक असून सांगली जिल्हा युवक समाचारचे संस्थापक संपादक आहेत. मुंबईस्थित महाराष्ट्र संपादक परिषदेचे अजीव सभासद असून प्रसारमाध्यम संपादक पत्रकार परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहिलेले आहेत. साप्ताहिक वृत्तपत्र संपादक परिषदेचे (नागपूर) माजी उपाध्यक्ष आहेत.

    महाराष्ट्रातील लघु व मध्यम वृत्तपत्राचे प्रश्न शासन स्तरावर सोडवण्यासाठी आत्तापर्यंत आप्पासाहेब पाटील यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासनमान्य यादीवर वृत्तपत्रांना दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे वितरण सुनियोजित असावे. यासाठी शासनाकडे वेगवेगळ्या पद्धतीने मागण्या करून त्याची पूर्तता करून घेतलेली आहे. तसेच लघु व मध्यम वृत्तपत्रांची निकोप वाढीसाठी नेहमीच आप्पासाहेब पाटील शासनाकडे विविध मागण्या करीत असतात.

    असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मेडीयम न्यूजपेपर ऑफ इंडिया या राष्ट्रीय वृत्तपत्र संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून आप्पासाहेब पाटील यांची निवड झाल्याबद्दल संघटनेचे राष्ट्रीय सचिव प्रवीण पाटील, कौन्सिल मेंबर जयपाल पाटील, चंद्रशेखर गायकवाड, प्रदेशाध्यक्ष प्रदिप कुलकर्णी, प्रसारमाध्यम संपादक पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गोरख तावरे, नेताजी मेश्राम, माजी जिल्हा माहिती अधिकारी एस.आर. माने, रंगराव शिपुगडे, सुमित कुलकर्णी, तेजस्विनी सूर्यवंशी, ए. आय. मुजावर, मुकुंद जोशी, शोभा जयपुरकर, अजिंक्य म्हात्रे, भगवान शहाणे, विजयसिंह पवार, अनिल आपटे, बाळासाहेब साळुंके, सुलतान फकीर यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code