Recent in Technology

Advertisement

Breaking News

सरकार सरकार खेळू

  याला फोडून त्याला तोडून
  नवे सरकार आपण काळू
  चला गड्यांनो या रे आता
  सरकार सरकार खेळू !!
  पक्ष,अपक्ष,हा भ्रम असे
  सत्य,ईमानास स्थान नसे
  गुळावरील माशा ह्या साऱ्या
  स्वच्छ सहद यांना ठावे नसे
  अरे जनतेची ऐशीतैशी
  धन,सत्ता,खुर्ची मागे पळू
  चला गड्यांनो या रे आता
  सरकार सरकार खेळू !!
  नैतिकता थोडी न ऊरली
  बेईमानी नसात भिनली
  प्रतिष्ठेचे भान हरपले
  जना मनाची लाज विकली
  कंबर नेसू सोडून आता
  चला रे डोक्याला गुंडाळू
  चला गड्यांनो या रे आता
  सरकार सरकार खेळू !!
  बंड करू रे विद्रोह करू
  स्वार्थास्तव आम्ही जगू मरू
  सुरत,पणजी,गुवाहाटी
  सारेच आपण मजा करू
  जनता दीन भोळी भाबळी
  आपणच मदमस्त वळू
  चला गड्यांनो या रे आता
  सरकार सरकार खेळू !!
  मूर्ख आम्ही मतदार झालो
  करतो ऊदोऊदो फुटीचा
  पहातो सहतोय नयना
  सोहळा लोकशाही लुटीचा
  आम्हीच आमच्या तिरडीचे
  गड्या बांधतोय आज वेळू
  चला गड्यांनो या रे आता
  सरकार सरकार खेळू !!
  धेय्य तुझे माझे एक गळ्या
  फक्त भरू आपल्याच झोळ्या
  लयलूट करू जनतेची
  बांधू उंचच सोनेरी माळ्या
  उदंड झाली गिधाडे आता
  म्हणती लोकशाहीस गिळू
  चला गड्यांनो या रे आता
  सरकार सरकार खेळू !!
  -वासुदेव महादेवराव खोपडे
  सहा पोलीस उपनिरीक्षक(सेनी)
  अकोला
  9923488556

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code