Recent in Technology

Advertisement

Breaking News

हेमंत प्रल्हाद देशपांडे यांनी केली अनोखी गुरुपौर्णिमा साजरी

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संचालित ,वीर वामनराव जोशी प्राथमिक शाळेतील सर्व कर्मचारीवृंद संस्थेचे प्रधानसचिव ,पद्मश्री प्रभाकरराव वैद्य व शालेय समिती अध्यक्षा डॉ. सौ. माधुरीताई चेंडके यांच्या मार्गदर्शनात शाळेत सतत विद्यार्थ्यांकरिता अभ्यासपूर्वक उपक्रमांचे आयोजन सातत्याने करीत असतात. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व व सर्वांगीण विकासाकरिता संस्था, शाळा व सर्व कर्मचारी वर्गाची धडपड बघून समाजातूनही त्याची विशेष दखल सातत्याने घेतली जात आहे.

    नुकतेच दि विदर्भ प्रीमियर हाऊसिंग सोसायटी अकोली रोड अमरावती, येथे राहणारे *हसतमुखी तो सदा सुखी* या व्यक्तीला अगदी सार्थ ठरविणारे ,आपल्या सामान्य जीवनशैलीतून असामान्यतेचा परिचय वेळोवेळी देणारे हेमंत प्रल्हादराव देशपांडे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेला भेट देऊन शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांकरीता अतिशय दर्जेदार स्वरूपाचे शैक्षणिक साहित्य नोटबुक विद्यार्थ्यांना भेट दिले. शाळेचे सेवानिवृत्त लिपिक श्री नंदकिशोर पेठकर हेही त्याच इमारतीमध्ये वास्तव्यास आहेत .पत्नी वर्षा, मुलगी शर्वरी व मुलगा राहुल यांच्या समवेत राहणारे देशपांडे हे आपल्या परिसरात त्यांच्या साधेपणा व चांगुलपणा करिता सर्वांनाच परिचित आहेत. नंदकिशोर पेठकर यांचे ते मित्र आहेत.

    बँकेतून सेवानिवृत्त झालेले, सतत सायकलीवरून फिरणारे देशपांडे यांनी यापूर्वीही शाळेला शाळा डिजिटल करिता आपले योगदान दिलेले आहे. "आपल्या सेवाव्रती्जगविख्यात संस्थेविषयी खरोखरच माझ्या मनात खूप आदर आहे. आपणा सर्वांची विद्यार्थीहिताकरिता असणारी धडपड बघून स्वयंप्रेरित होऊन माझे विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेला शैक्षणिक साहित्य प्रदान करण्याची जी मनशा होती ती आपण पूर्ण केलेली आहे, आपले धन्यवाद!" असे देशपांडे यांनी यावेळी नमूद केले. तर आपल्यासारख्या उदार अंतःकरणाच्या व्यक्तींमुळे समाजात मानवता टिकून आहे. असे यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दिलीप सदार म्हणाले. यावेळी हेमंत देशपांडे यांच्यासोबत शाळेचे सेवानिवृत्त लिपिक नंदकिशोर पेठकर, सचिन वंदे, विलास देठे, अमोल पाचपोर, दिलीप सदार, मोनिका पाटील, संध्या कुऱ्हेकर, ज्योती मडावी व विद्यार्थ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code