Recent in Technology

Advertisement

Breaking News

‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची मुलाखत

    मुंबई, : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर शनिवार,दि. 16 जुलै व सोमवार, दि. 18 जुलै 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक श्रीमती मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.

    देशात दि.18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होत असून ही निवडणूक कशी घेतली जाते, मतांचे मूल्य म्हणजे काय, या निवडणुकीमध्ये सहभागी यंत्रणा तसेच मतदान पेटीचा विमान प्रवास याविषयी सविस्तर माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code