Recent in Technology

Advertisement

Breaking News

शाळेतली मज्जा...

  शाळेत जाण्याची मजा काही वेगळीच होती. त्यातून वर्गात एन्ट्री करण्याची पद्धत तर खूप भारी. जीवाला जीव लावणार्या मैत्रिणी भेटल्या. आधी शाळा नको वाटायची पण नाही माहित कशी गोडी लागली. आता आठवतेय ती सर्व मज्जा मस्ती आणि छोट्याशा कारणासाठी केलेलं भांडण. सारखं रागवायचे आणि आपला हक्क गाजवायचे वर्ग प्रतिनिधी म्हणून सगळ्यांना समजून ही घ्यायचे शेवटी सर्वांची लाडकी जी होते. पण तेव्हा हे कळत नव्हतं की ही मज्जा मस्ती पुन्हा नाही अनुभवता येईल अशा मैत्रिणी जीवनात पुन्हा नाही भेटणार.

  जेवताना घासातला घास काडून दिलो तर नविन वर्ष, दिवाळी या क्षणी एकमेकींना घास भरविलो. लहान होतो त्यामुळं कळत नव्हतं या मैत्रीची किंमत पण आता मोठे झालो आणि कळलं की मैत्री हा मौल्यवान मोती आहे आणि तो प्रत्येकाच्या वाट्याला येतो पण तो किती जपून ठेवायचा हे आपल्या हातात असतं भांडण तर खूप केलो. रडलो, हसलो, खेळलो पुन्हा एकत्र आलो आणि आयुष्यातले अलौकिक क्षण एकत्र घालवलो.

  अजूनही आठवतात ते दिवस शाळेत जातेवेळेस जशी मज्जा करायची तशी येतेवेळेस देखील करायची. आम्ही सर्व मैत्रिणी मराठीच्या तासाची वाट बघायचो. कारण सर्वात आवडता विषय म्हणजे मराठी आणि शिक्षिका देखील आवडत्या जेव्हा कांबळे मॅडम वर्गात यायच्या तेव्हा वाटायचं की, मराठीचा तास कधी संपूच नये.त्यांनी मराठी शिकवतच आयुष्यात जीवन कसं जगायचं याचे धडे दिले कधी कोणाला कमी नाही समजले. सर्व विद्यार्थी एकसारखेच म्हणून मायेने शिकवायचे.

  गणिताचा तास म्हंटलं की, सर्व मैत्रीणींना भीती वाटायची गणित हा विषय तसा सोपा परंतु आम्हाला सूत्रच पाठ करू वाटायची नाहीत ना! म्हणून वाटे तो अवघड. गणित अवघड तसं त्या विषयाच्या शिक्षिका देखील कडक जेव्हा दुगम मॅडम वर्गात यायच्या तेव्हा पहिल्या बेंचवर बसलेली मुलगी देखील शेवटच्या बेंचवर जाऊन बसायची. मॅडम तशा स्वभावाने खूप छान परंतु त्यांचा राग डोक्यात गेला की समोर कोण आहे याचे देखील त्यांना भान नसायचे. पण आम्ही घडलो ते यांच्यामुळे कारण मॅडम असे वागल्या त्यामुळे आम्ही गणिती कोडे सोडऊ शकतो. त्याच तर कठोर झाल्या नसत्या तर आम्हाला तरी काय येणार होतं त्यांच्यामुळे स्वाभिमान जागा झाला. दुसऱ्याच्या कष्टावर जगण्याऐवजी स्वतःच्या कष्टाचं महत्त्व पटवून दिले. कष्टाची भाकर नेहमी गोड लागते हे शिकवलं. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला धाडसाने सामोरे जायचे अशी उम्मिद दिली.

  इतिहास हा माझा आवडीचा विषय. लहानपणी शिवरायांच्या गोष्टी ऐकायचे तेव्हा एक मनात वेगळीच भावना यायची कधी-कधी वाटायचं ह्या गोष्टीत आपण पण राहायला पाहिजे होतं. त्यांचे ते धाडसी विचार ऐकून असं वाटायचं की आपणही त्यांच्यासारखं बनावं त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकावं त्यांचा इतिहास जाणून घेण्यात रस होता त्यामुळे इतिहास माझा आवडीचा विषय. त्यातूनच याचे शिक्षिका म्हणजे मला आवडणारे जाधव मॅडम.गमंत म्हणजे जेव्हा जाधव मॅडम पहिली वेळेस शाळेत आल्या तेव्हा त्या मला आवडत नव्हते याचं कारण म्हणजे जेव्हा आम्ही नववीत होतो तेव्हा पहिली वेळेस वर्गावर आल्या आणि यांचा खरा तर इंग्लिश विषय होता म्हणून इंग्लिश शिकवत होत्या पण आम्हाला आठवी पर्यंत कोणी इंग्लिश शिकवलंच नव्हतं त्यामुळे आम्हाला त्यातलं काहीच समजत नव्हतं म्हणून मॅडम ओरडल्या तेव्हा मला खूप राग आला होता पण माझा राग चुकीचा आहे हे मलाच कळत नव्हतं म्हणून मी सर्व मैत्रीणींना घेऊन डायरेक्ट मुख्याध्यापकांकडे मॅडमची तक्रार केली मी पुढे होते आणि बाकी मैत्रिणी मागे.इतकं होऊन पण नंतर त्याच मॅडम माझ्या आवडत्या झाल्या. कारण नंतर मला त्यांच्या रागवण्याचा उद्देश कळले. जाधव मॅडम इतिहास खूप छान शिकवायचे त्यांचा विषय इंग्लिश होता पण आम्हाला इतिहास देखील छान शिकवायचे ते पूर्ण इतिहास असं समोर ठेवायचे जणू ते मुलींना लगेच कळायचं त्यांनी पाहिलेलं प्रत्येक ठिकाण ते सांगायचे आणि पॉइंटला धरून चालायचे त्यांच्या आठवणी ऐकण्यात आणिहसत खेळत तेच इतिहास शिकण्यात एक वेगळीच मज्जा होती.

  विज्ञान शिकायचं म्हंटलं की, डोक्यावरूनचं जायचं सर्वात नावडता विषय म्हणजे विज्ञान. काय माहित पण विज्ञान हा विषय कोणालाच आवडत नव्हता. नशीब विज्ञान शिकवायला दुगम मॅडम होत्या त्यामुळे काहीतरी शिकलो, थोडंतरी समजलं नाहीतर विज्ञान आमच्या डोक्याच्या दिडफुट उंचीवरून जायचा.हिंदी शिकवायला कांबळे मॅडम .शिक्षक कमी असल्यामुळे दोन-दोन विषय एका शिक्षकाकडे होते. तशा कांबळे मॅडम मराठीच्या शिक्षिका परंतु हिंदी हा विषय देखील खूप छान पद्धतीने शिकविला.

  राहिले विषय इंग्लिश आणि भूगोल इंग्लिशची वाटत नव्हती भीती परंतु अवघड जात होता भूगोल जेव्हा आले घाटवाले सर मग तेव्हा अवघड विषयही सोपा वाटू लागला सर्वांना अवघड जाणारा विषय, घाटवाले सर शिकावायले तेव्हा तर सर्वांचा आवडता विषय झाला.काय माहित पण घाटवाले सरांकडे एक वेगळीच जादू होती की, त्यामुळे आम्हला भूगोल व इंग्लिश या दोन्ही विषयाची भीती नाहीशी झाली इतकं तरी सोपं करून शिकवले.

  आता आठवतात ते क्षण जे शाळेत सरांच्या व मॅडमंच्या डोक्याला किती ताप होतो. आपल्या मुळे त्यांना कीती त्रास झाला ते. वाटलं नव्हतं की, शाळेशी इतका संबंध आपला जोडेल पण नकळत संबंध जोडला आणि ते एक घट्ट नातं बनलं आता एवढा त्रास का होतोय हे समजलं जी दहा वर्ष आनंदाने या शाळेत घालवली सर्व शिक्षकांना आपलंसं केलं घरी कमी पण शाळेत जास्त मज्जा मस्ती केली आईपेक्षा मैत्रीणींना जवळचे मानलो मनातलं गुपित सगळे तिला सांगितलो . तिच्याशी भांडलो तिला रागावलो शेवटी एकत्र आलो.

  आता सगळ्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या. एकत्र होतो तेव्हा कळलं नव्हतं पण आता वेगळे झालो तर कळतय की, शाळा काय होती. शाळा एक मंदिर आहे ज्ञानाने भरलेला अफाट सागर आहे.खूप काही आहे घेण्यासारखे पण; आपल्याला ते योग्य काळी घ्यायचं आहे. एकत्र होतो आम्ही तेव्हा मी मोठी का तू मोठी केलो ; पण नंतर समजलं की दोघीही मोठे नाही आणि दोघीही लहान नाही बरोबरीने आयुष्याची वाट धरायची आहे; पण वेळ निघून गेल्यावर समजलं.

  जेव्हा वेळ होती तेव्हा नाही कळलं पण असुदेत ते, आम्ही वाट बघत होतो दहावीच्या स्वयंशासन दिनाची, हौस होती शिक्षक बनण्याची तो दिवस आला आणि हवेच्या वेगाने निघून गेला कळलं देखील नाही . आनंदाचा दिवस तर होताच त्याहुनी जास्ती दुःखाचा होता आनंद याचा होता की आम्हीं शिक्षका बनलो आणि दुःख याचे होते की आता शाळा सोडून जाणार म्हणून. कसं असतं ना! शाळेत येते वेळेस पण रडत आलो आणि बाहेर जाते वेळेस पण रडतच जातो. येते वेळेस शाळेला जायचं नाही म्हणून रडायचं तर शाळेतून बाहेर निघताना का बाहेर जात आहोत म्हणून रडायचं कसं असतं ना आयुष्यात कणभर सुख तर पर्वता एवढं दुःख असतं.

  सर्व शिक्षकांचे आशीर्वाद घेऊन बाहेर तर पडलो. स्वप्न पूर्ण करायचे आहे. आयुष्यात माझ्या जे गुरू मला लाभले त्या सर्व गुरूंना मी प्रणाम करते व माझ्या सर्व जिवलग मैत्रीणींना त्यांच्या पुढील भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा देते आणि माझ्या लिखाणाला आता इथेच थांबवते.

  -कुु स्नेहा शिवाजी जाधव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code