Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या विकास कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न

    * आमदार देवेंद्र भुयार यांनी उपलब्ध करून दिला ५१ लक्ष रुपयांचा निधी !

    वरुड : वरुड शहरातील प्रभाग क्रं 9 मधील "विठ्ठल रुख्मिणी" मंदिराचा विकास करणे या कामाकरिता वैशिष्टपुर्ण निधी योजने अंतर्गत 51 लक्ष रुपये निधीची तरतुद करुन देण्यात आली होती त्याअनुषंगाने मंदिराचे काम पुर्ण झाले असुन आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या विकास कामाचा "लोकार्पण सोहळा " आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते विठुरायाच्या चरणी नतमस्तक होवुन पार पाडण्यात आला.

    यावेळी लोकार्पण कार्यक्रमाला आमदार देवेंद्र भुयार, जोशी काका, तालुकदार काका ,देशपांडे काका, प्रभाकर काळे, आकाश बेलसरे, जगदीश बेलसरे, महेंद्र देशुमख, संजुभाऊ कानुगो, तुषार देशमुख शहर प्रमुख,युवराज आंडे, मनोज गुल्हाने,निखिल बनसोड, स्वप्निल आजनकर, संजय चक्रपाणी,प्रफुल अनासाने,जितु शहा, धिरज अंबाडकर, जगबीर सिंग,संकेत यावलकर तसेच विठ्ठल रुक्मिणी संस्थानचे कार्यकारी मंडळ आणि स्थानिक नागरिक व महिला सदस्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code