- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : देवरी गावाजवळ पेढी नदीवर पुलाचे बांधकाम सुरू असल्याने देवरी- शिराळा रस्त्यावरील वाहतुकीत दि. 30 सप्टेंबरपर्यंत बदल करण्यात आला आहे. तशी अधिसूचना जिल्हा दंडाधिकारी पवनीत कौर यांनी जारी केली.
अधिसूचनेनुसार, अमरावती तालुक्यातील शिराळा-यावली-डवरगाव-मोझरी रस्ता रा. मा. 308 वर देवळी गावाजवळ पेढी नदीवर पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे हा रस्ता दि. 30 सप्टेंबरपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आला आहे. या रस्त्यावरील वाहतूक देवरी-रोहणखेडा-पुसदा ते शिराळा, तसेच देवरी-कठोरा गांधी- नांदगावपेठ-कठोरा बु.-पुसदा ते शिराळा या पर्यायी रस्त्यांवरून वळविण्यात आली आहे.
पेढी नदीवर 50 मीटर लांब व 12 मीटर रूंद पूल बांधण्यात येत आहे. पुलाच्या पायव्याचे काम पूर्ण झाले असून, पुढील काम प्रगतीत आहे. दरम्यान, वाहतुकीसाठी सुविधा म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या बाजूस तात्पुरता वळण रस्ता तयार केला होता. तथापि, पावसाळ्यात पेढी नदीला मोठा पूर येत असल्याने तात्पुरता वळण रस्ता टिकाव धरू शकणार नाही. हे लक्षात घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्यायी मार्गांचा वाहतुकीसाठी वापर करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला. त्यानुसार अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या