Recent in Technology

Advertisement

Breaking News

"स्वप्नांचे समुपदेशन" एक दिवशीय कार्यशाळा संपन्न

* अमरावती स्पंदन परिवार बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन आत्मविश्वास विकसित करण्यासाठी आणि ध्येय प्राप्तीसाठी - "स्वप्नांचे समुपदेशन" या एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन रविवारी बीइंग आर्टिस्ट अकॅडेमी ऑफ फिल्म अँड थिएटर आर्टस्, अमरावती येथे करण्यात आले होते.

    आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात मोबाइल, संगणक, इंटरनेट इत्यादी दृकश्राव्य साधनांद्वारे नको ते विषय विद्यार्थी हाताळतात आणि बाह्य प्रलोभनांना बळी पडतात तसेच सततच्या परीक्षा, खासगी वर्ग, खेळण्यावर मर्यादा, मित्र-मैत्रिणींत होणारी तुलना, पालकांचे दुर्लक्ष इत्यादी कारणांमुळेही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक जीवनात समस्या निर्माण होतात. त्यांचे निवारण होण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या ध्येय प्राप्तीचा मार्ग मोकळा करण्यासाठी अमरावती स्पंदन परिवार बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र स्टुडन्ट युनियन, AYS सिनेमा प्रोडकशन, बीइंग आर्टिस्ट अकॅडेमी ऑफ फिल्म अँड थिएटर आर्टस्, यांच्या संयुक्त विद्यमाने "स्वप्नांचे समुपदेशन" या एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला संस्थेचे अध्यक्ष पंकज धंदर, संस्थेच्या कार्यकारी अधिकारी स्नेहा वासनिक, संस्थेचे जनसंपर्क अधिकारी वर्षा इंगोले तसेच शशिकांत तायडे उपस्थित होते.

    संस्थेच्या कार्यकारी अधिकारी तथा कार्यशाळेच्या समुपदेशक स्नेहा वासनिक म्हणाल्या कि, विद्यार्थ्यांना स्वत:च्या बऱ्यावाईट कृती समजून घेण्यास आणि परिणामकारक रीत्या सुखी जीवन व्यतीत करण्यास साह्यभूत ठरणारी समुपदेशन हि एक वैज्ञानिक दृष्टिकोन देणारी आधुनिक संकल्पना आहे. सहज कौशल्य बळावर आत्मविश्वास वाढवून ध्येय प्राप्तीचा मार्ग मोकळा करता येतो हे कार्यशाळेत विविध वैचारिक खेळांच्या माध्यमातून सिद्ध करण्यात आले. प्रत्येक खेळातून विद्यार्थ्यांनाच निष्कर्ष काढायला सांगितले, निष्कर्ष आणि आपले स्वप्न यांचा संबंध दाखवून, आपले स्वप्न म्हणजे आयुष्यातील ध्येय कसे प्राप्त करायचे आणि आयुष्यात येणाऱ्या अडचणींना सकारात्मक दृष्टिकोनातून कश्याप्रकारे सोडवायचे यावर सामूहिक तसेच वैय्यक्तिक समुपदेशन करण्यात आले.

    नवीन शैक्षणिक धोरण तसेच स्वप्नाचे समुपदेशन या एकदिवसीय कार्यशाळेचे महत्व सांगतांना, संस्थेचे जनसंपर्क अधिकारी वर्षा इंगोले म्हणाल्या कि, विद्यार्थ्यांनी ध्येय प्राप्ती साठी धडपडत असतांना परिस्तिथी नुसार आत्मविश्वास न गमावता योग्य निर्णय घेणे महत्वाचे असल्याचे सांगितले तर अश्या पद्धतीच्या कार्यशाळा आयोजनामुळे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना चालना मिळते तसेच ध्येय निश्चितीसाठी आणि ध्येय प्राप्तीसाठी समुपदेशन कार्यशाळेंचे आयोजन सतत होणे आवश्यक असल्याचे मत उपस्तित शशिकांत तायडे यांनी व्यक्त केले.

    कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे कोषाध्यक्ष प्रविणसिंग तोवर, सहसचिव अमित जगताप, आजीवन सदस्य नंदकिशोर गवळी यांनी अथक परिश्रम घेतले तर सृष्टी पाटील, सलोनी गवई, भाग्यश्री गाढवकर, साक्षी मेश्राम, आदिती हरणे, मयुर चौधरी, प्रतीक शिरसाठ, प्रज्वल वानखेडे, निखिल विल्हेकर, रुपेश खंडारे आदींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code