Header Ads Widget

शेघाट येथील शोभा दुपारे यांच्यावर पोटाच्या कॅन्सर गाठीची 3 लाख रुपयांची मोफत शस्त्रक्रिया

    * आमदार देवेंद्र भुयार यांच्या विशेष प्रयत्नामुळे दुपारे कुटुंबियांना मिळाला दिलासा
    * आमदार देवेंद्र भुयार ठरत आहे रुग्णांसाठी देवदूत !

    वरुड तालुका प्रतिनिधी : मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या विशेष प्रयत्नाने, शेघाट येथील शोभा भगवान दुपारे या महिलेच्या पोटाच्या कॅन्सर गाठीची 3 लाख रुपयांची मोफत शस्त्रक्रिया कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल अंधेरी मुंबई येथे यशस्वीरीत्या संपन्न झाली असून रुग्ण व नातेवाईकांनी आमदार देवेंद्र भुयार यांना प्रत्यक्ष भेटून आभार मानले आहे.

    रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या उक्तीप्रमाणे नेहमीच आरोग्य सेवा तत्परतेने बजावणारे तसेच मतदार संघातील गरजू रुग्णांना नेहमी मदतीचा हात देणारे आमदार देवेंद्र भुयार हे हजारो रुग्णांसाठी देवदूत ठरले आहेत. शेघाट येथील रुग्ण शोभा भगवान दुपारे या पोटाच्या कॅन्सर च्या गाठीने या क्रिटिकल आजाराने ग्रासलेली असतांना व अनेक त्रास भोगत असतांना आमदार देवेंद्र भुयार यांनी मदतीचा हात देऊन 3 लाख रुपयांची यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया मोफत करवून दिली. कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल अंधेरी मुंबई येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करून शोभा भगवान दुपारे या महिलेला जीवदान मिळाल्याबद्दल दुपारे कुटुंबीयांनी आमदार देवेंद्र भुयार यांना भेटून आभार मानले.

    शोभा दुपारे या महिलेची सर्व व्यवस्था आमदार देवेंद्र भुयार यांनी पूर्णपणे मोफत करुन दिली. यासाठी रुग्णमित्र पंकज ठाकरे यांचे विशेष सहकार्य लाभले. रुग्ण व नातेवाईक विविध खासगी रुग्णालयामध्ये गेले असता त्यांना मोठ्या प्रमाणात खर्च येणार असल्याचे कळल्यामुळे दुपारे कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले होते व खासगी रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च करूनही उपयोग होत नव्हता. मग आमदार देवेंद्र भुयार यांच्या जवळ त्यांचे नातेवाईकांनी सर्व परिस्थिती सांगितली असता आमदार देवेंद्र भुयार यांनी क्षणाचाही विलंब न करता मुंबई येथील डॉक्टर यांची अपॉइंटमेंट घेऊन शोभा भगवान दुपारे यांना कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल अंधेरी मुंबई येथे ऍडमिट करून 3 लाख रुपयांची मोफत शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या संपन्न झाल्यामुळे शेघाट येथील शोभा भगवान दुपारे यांना दिलासा मिळाला असून दुपारे कुटुंबीयांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या