Header Ads Widget

विभागीय लोकशाही दिन 11 रोजी

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने दि. 11 जुलै रोजी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

    नागरिकांनी शासकीय विभागाशी निगडित तक्रारी, गाऱ्हाणी इत्यादी संदर्भातील प्रकरणे, निवेदन लेखी स्वरुपात सादर करावे. नागरिकांनी त्यांच्या तक्रारी पोस्टाद्वारे, dcgamravati@gmail.com/dcg_amravati@rediffmail.com या संकेतस्थळावर किंवा व्यक्तीश: विभागीय आयुक्त कार्यालयात हजर राहावे, असे विभागीय उपआयुक्त संजय पवार यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या