• Fri. Jun 9th, 2023

सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल अमरावती येथे लस प्रतिबंधात्मक आजार बाबत कार्यशाळा

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : दि.28/06/2022 रोजी सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल अमरावती येथे लस प्रतिबंधात्मक आजार बाबत कार्यशाळा पार पडली. सदर कार्यशाळेस महानगरपालिका अमरावती अंतर्गत अतिरिक्त आयुक्त श्री. हर्षल गायकवाड, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ.विशाल काळे, डॉ.जयश्री नांदुरकर, श्रीमती विद्या बारसे, नागरी आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी, सार्वजनिक आरोग्य परिचारक/परिचारिका व मनपा दवाखान्यातील डॉक्टर इंचार्ज उपस्थित होते.

    सदर कार्यशाळामध्ये मार्गदर्शन, मार्गदर्शक सुचना व कारावयाच्या कार्यवाहीबाबत डॉ.एस.आर.ठोसर, सर्वेलन्स वैद्यकिय अधिकारी – जागतिक आरोग्य संघटना, अकोला यांनी केले. सदर कार्यशाळेमध्ये महानगरपालिका अमरावती कार्यक्षेत्रामध्ये सर्वेक्षण करुन त्या अंतर्गत ताप व अंगावर रॅश असलेल्या रुग्णांचा शोध घेवुन व उपाय योजना करुन त्याबाबतची माहिती शासनास सादर करणे तसेच पोलिओ, मिझल-रुबेला, डांग्या खोकला, घटसर्प, धनुर्वात, नवजात बालकांचे लसिकरण मधील गुतांगुत इत्यादी बाबी सर्वेक्षणातून शोधणे व त्याबाबत अहवाल शासनास वेळोवेळी सादर करणे व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

    जागतिक आरोग्य सल्लागार डॉक्टर ठोसर व वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका अमरावती डॉक्टर विशाल काळे यांनी गोवर व रूबेला या रोगांच्या प्रिव्हेन्शन साठी सर्व प्रकारच्या फिवर व rash (ताप व चट्टे) याचे तात्काळ रिपोर्टिंग करण्यासाठी खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांना आव्हान केले तसेच सर्व आशाना सदर बाबतीत सर्वे करून नोटिफिकेशन करण्यासाठी आदेशित केले. तसेच संशयितांना कन्फर्मेशन साठी सीरम सॅम्पल (रक्त नमुना) देण्यासाठी आवाहन करण्यात आले.कार्यशाळा संपन्न झाल्यानंतर मा. अतिरिक्त आयुक्त, हर्षल गायकवाड यांनी महानगरपालिका आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी व मनपा दवाखान्यातील डॉक्टर इंचार्ज यांना कार्यशाळेमध्ये दिलेल्या सुचनेप्रमाणे त्यांचे अधिनस्त कार्यरत कर्मचारी यांना प्रशिक्षण देवून व त्यांचे कडुन सर्वेक्षण करुन अहवाल नियमितपणे शासनास सादर करणेबाबत निर्देश दिलेत.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *