सह दुय्यम निबंधक (ग्रामीण) कार्यालय सुट्टीच्या दिवशी सुरू राहील

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : दस्त नोंदणी करण्यासाठी नागरिकांची गैरसोय टळावी व नोंदणीला गती यावी, यासाठी येथील सह दुय्यम निबंधक वर्ग-2 (अमरावती ग्रामीण कार्यालय) शनिवार व रविवार या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू राहील.

    नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणावर दस्त दाखल होत आहेत. सर्व्हर स्लो असल्यामुळे दस्तऐवज नोंदणीला वेळ लागत आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता सह दुय्यम निबंधक, अमरावती ग्रामीण कार्यालयाचा दस्त नोंदणीचा वेळ 2 तासांनी वाढविण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे, प्रत्येक शनिवारी व रविवारी हे कार्यालय पुर्णपणे सुरु ठेवण्याबाबत सहजिल्हा निबंधकांनी आदेश दिले. त्यानुसार दोन्ही सुट्टीच्या दिवशी हे कार्यालय दस्त नोंदणीसाठी सुरु राहणार आहे. पुढील आदेशापर्यंत हा निर्णय लागू राहील. दस्त नोंदणीसाठी एकाच वेळी गर्दी होऊ नये. त्यामुळे हा निर्णय झाला असून, नागरिकांनी आता सुट्टीच्याही दिवशी कार्यालय सुरु राहणार असल्यामुळे सवडीने दस्तनोंदणी करावी व गर्दी टाळावी, असे आवाहन सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल औतकर यांनी केले.