सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना सतर्कतेचा इशारा देण्याचे आदेश-ललितकुमार व-हाडे निवासी उपजिल्हाधिकारी यवतमाळ

सुनील शिरपुरे/झरीजामणी

जिल्ह्यात काल-परवाच्या रात्री पासून सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु आहे. तसेच जिल्ह्याच्या उत्तरेस असलेल्या अमरावती जिल्ह्यात सुद्धा पाऊस सुरू आहे. सध्यपरिस्थितीत उर्ध्व वर्धा प्रकल्प तालुका मोर्शी जि.अमरावती मधील ३ गेट मधून ४० से.मी. विसर्ग व निम्न वर्धा प्रकल्प धनोडी ता आर्वी जि.वर्धा मधून १९ गेट मधून ५० से.मी. विसर्ग वर्धा नदीचे पात्रात सुरू आहे. तसेच इसापूर प्रकल्पाची पाणी पातळी ८१३.२१ दलघमी झाली असून ८४ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे व धरणसाठा १०० टक्के झाल्यास कोणत्याही क्षणी धरणातून विसर्ग करण्यात येईल, याबाबत यापूर्वीच इशारा दिला आहे. करीता संभाव्य परिस्थिती लक्षात घेता कोणत्याही क्षणी पाणी पातळीत वाढ होवून किंवा झाल्यास पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. करीता वर्धा व पैनगंगा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा.