Contents hide
- याला फोडून त्याला तोडून
- नवे सरकार आपण काळू
- चला गड्यांनो या रे आता
- सरकार सरकार खेळू !!
- पक्ष,अपक्ष,हा भ्रम असे
- सत्य,ईमानास स्थान नसे
- गुळावरील माशा ह्या साऱ्या
- स्वच्छ सहद यांना ठावे नसे
- अरे जनतेची ऐशीतैशी
- धन,सत्ता,खुर्ची मागे पळू
- चला गड्यांनो या रे आता
- सरकार सरकार खेळू !!
- नैतिकता थोडी न ऊरली
- बेईमानी नसात भिनली
- प्रतिष्ठेचे भान हरपले
- जना मनाची लाज विकली
- कंबर नेसू सोडून आता
- चला रे डोक्याला गुंडाळू
- चला गड्यांनो या रे आता
- सरकार सरकार खेळू !!
- बंड करू रे विद्रोह करू
- स्वार्थास्तव आम्ही जगू मरू
- सुरत,पणजी,गुवाहाटी
- सारेच आपण मजा करू
- जनता दीन भोळी भाबळी
- आपणच मदमस्त वळू
- चला गड्यांनो या रे आता
- सरकार सरकार खेळू !!
- मूर्ख आम्ही मतदार झालो
- करतो ऊदोऊदो फुटीचा
- पहातो सहतोय नयना
- सोहळा लोकशाही लुटीचा
- आम्हीच आमच्या तिरडीचे
- गड्या बांधतोय आज वेळू
- चला गड्यांनो या रे आता
- सरकार सरकार खेळू !!
- धेय्य तुझे माझे एक गळ्या
- फक्त भरू आपल्याच झोळ्या
- लयलूट करू जनतेची
- बांधू उंचच सोनेरी माळ्या
- उदंड झाली गिधाडे आता
- म्हणती लोकशाहीस गिळू
- चला गड्यांनो या रे आता
- सरकार सरकार खेळू !!
- -वासुदेव महादेवराव खोपडे
- सहा पोलीस उपनिरीक्षक(सेनी)
- अकोला
- 9923488556