• Sat. Sep 23rd, 2023

विद्यापीठाची पदवीधर नोंदणी प्रक्रिया सुलभ आणि सोयीस्कर असावी – प्रा प्रदीप खेडकर

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    * शिक्षण मंचचे पदवीधर नोंदणी प्रक्रियेतील सुधारणांसाठी निवेदन
    * नोदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांनी मतदार यादीत स्वत:चे नाव समाविष्ट करून विद्यापीठाचा उत्कर्ष करण्यात सहभाग व्हावे
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाद्वारा विद्यापीठ निवडणूक – २०२२ साठी नोंदणीकृत पदवीधर नोंदणीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या प्रक्रियेतील क्लिष्टता कमी व्हावी व विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संख्येने नोंदणी करून आगामी विद्यापीठ निवडणूकीत सहभाग नोंदविता यावा यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंच द्वारा विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ तुषार देशमुख यांना निवेदन सादर करून विस्तृत चर्चा केली.

    नोंदणी प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पदवी प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलेले आहे. अनेक विद्यार्थ्यांना विविध कारणांनी पदवी प्रमाणपत्र प्राप्त झालेले नसल्यामुळे स्वतः ची नोंदणी करता येणार नाही. अशा अनेक विद्यार्थ्यानी शिक्षण मंच संघटनेकडे धाव घेत त्यांना विद्यापीठ निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मार्ग काढण्याची विनंती केली. यावर अभ्यासाअंती निवडणूक आयोगाच्या पदवीधर मतदार संघासाठी नोदणी करण्यासाठी अनेक पर्याय देण्यात आलेले असल्याचा संदर्भ देण्यात आला. त्याचप्रमाणे विद्यापीठाने पदवीधर म्हणून नोंदणी करण्यासाठी पदवी प्रमाणपत्राऐवजी अंतिम वर्ष उत्तीर्ण केल्याची गुणपत्रिका ग्राह्य धरण्यात यावी यासाठी शिक्षण मंचद्वारा मागणी करून त्याबाबतीत सकारात्मक निर्णय घ्यावा व सुधारित सूचना जाहीर करावी अशी विनंती करण्यात आली.

    त्याचप्रमाणे ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अर्ज भरून सादर केल्या नंतर फक्त फॉर्म ची प्रिंट निघते व त्यासोबत सर्व कागदपत्रे देखील लावण्याची सूचना करण्यात आलेली आहे. याबाबतीत सर्व दस्तावेज अपलोड केले असताना पुन्हा त्यांची प्रिंट काढून विद्यापीठाला सादर करणे अनावश्यक असल्यामुळे याबाबतीत देखील विचार व्हावा अशी विनंती करण्यात आली.

    ऑफलाईन पद्धतीने नोदणी करतेवेळी प्रथम विद्यापीठात जाऊन नोदणी शुल्क भरणे व त्यानंतर इंटरनेटवर जाऊन नोंदणी अर्ज भरणे आणि पुन्हा पावतीसह सदर अर्ज विद्यापीठाने जमा करणे अशी प्रक्रिया ठरविण्यात आली आहे. यावर आक्षेप घेत विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा विद्यापीठात यावे लागू नये यासाठी या प्रक्रियेत सुधारणा करावी अशी सूचना यावेळी करण्यात आली.

    ————-

    विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्ता वर्धनासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग असावा यासाठी सर्व पदवीधर विद्यार्थ्यांनी या नोंदणी प्रक्रियेत सहभागी व्हावे. स्वतःचे नाव नोदणी झाल्यानंतर पुढील प्रक्रीयेअंतर्गत मतदार यादीत आपले नाव येण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुन्हा अर्ज करणे आवश्यक आहे याची नोंद सर्व विद्यार्थी बंधू भगिनींनी घ्यावी. कुठलीही अडचण असल्यास विद्यार्थ्यांनी शिक्षण मंच संघटनेच्या कार्यालयात संपर्क केल्यास सर्वतोपरी मदत करण्यात येईल.

    – प्रा प्रदीप खेडकर
    ——–

    नोंदणी आणि निवडणूक सहभागासाठी महत्वपूर्ण –

    १. दोन टप्पे: पदवीधर म्हणून नोंदणी करणे आणि विद्यापीठाची निवडणूक अधिसूचना जारी झाल्यानंतर मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नूतनीकरणचा ऑनलाईन अर्ज करणे.
    २. पात्रता: २०२१ पूर्वीची अमरावती तसेच १९८३ पूर्वीची नागपूर विद्यापीठाची कोणतीही स्नातक (युजी) पदवी. पारंगत (पीजी) चालणार नाही.
    ३. अर्ज करण्याची मुदत: २० जुलै
    ४. आवश्यक दस्तावेज: पदवी प्रमाणपत्र आणि आधार कार्ड

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,