युवा स्वाभिमान पार्टीचे कडून विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे यांचा सत्कार

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    अमरावती जिल्ह्यातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा करावा या मागणीचे निवेदन आयुक्तांना सादर
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : आमदार रवी राणा, खासदार नवनीत रवी राणा यांचे युवा स्वाभिमान पार्टीचे कडून पदाधिकाऱ्यांनी आज दिलीप पांढरपट्टे विभागीय आयुक्तांचा पुष्गुच्छ देऊन सत्कार केला.

    त्यांना जिल्ह्यामध्ये होणाऱ्या दूषित पेयजला मुळे ते प्यायल्याने नागरिकांचा व लहान मुलांचा मृत्यू होत आहे. कुठलीही उपाययोजना जिल्हा प्रशासनकडून होत नाही त्यामुळे यापूर्वी मेळघाट चिखलदरा तालु्यातील पाचडोंगरी, कोयलारि येथील घटना ताजी आस्त्तांनाच आता शिंदी बुद्रुक तालुका अचलपूर येथील मुलीचा दूषित पेयजला मुळे मृत्यू झाल्याचे समजते आहे. म्हणून अशा कुटुंबियांना सरकार कडून आर्थिक मदत मंजूर करण्यात यावी.

    वरीप्रमाणे घटना वारंवार जिल्ह्यात घडत आहेत सदर प्रकरणात लक्ष घालून जे कोणी अधिकारी या घटनेस जबाबदार आहे त्यांचे वर कठोर कारवाई करण्यात यावी.अशी मागणीहि युवा स्वाभिमान पार्टीचे कडून विभागीय आयुक्तांकडे दिलेल्या निवेनातून करण्यात आली.जिल्हातील नागरिकास शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या साठी अमृत योजने अंतर्गत घर घर नळ कनेक्शन देण्यात यावे. अश्या विषयाचे निवेदन सोपविले या वेळी सुनील राणा, उमेश ढोणे, दिनेश टेकाम, बंडू डकरे, सुभाष खंडार, अजय घुले आदी युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.