मोर्शी : आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी विधानसभा मतदार संघाच्या विकासाचे अनेक प्रश्न मांडून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा पवार यांच्या कडे निधीची मागणी केली. मोर्शी शहराचा सर्वांगीण विकास व कायापालट करण्याचा संकल्प घेऊन आमदार देवेंद्र भुयार यांनी आपल्या सुरुवातीच्या काळातच भरगॊस निधी खेचून आणला आहे. या भरीव निधि अंतर्गत मोर्शी विधानसभा मतदार संघात विकास कामांचा धडाका सुरु असल्याने मोर्शी मतदार संघातील नागरिकांना विकासाचे पर्व अनुभवास मिळत आहे.
यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते मोर्शी शहरातील वैशिष्टपुर्ण निधी योजने अंतर्गत प्रभाग क्रमांक 9 मधील राधाकृष्ण मंदिर, हनुमान नगर येथील मैदान ओपनस्पेस विकसित करणे करिता 09 लक्ष 83 हजार 723 रुपये , पवन अग्रवाल ते नवल अग्रवाल यांचे घरापर्यंत डांबरीकरण करणे करिता “रस्ता अनुदान योजना” अंतर्गत 06 लक्ष 44 हजार रुपये, राधाकृष्ण कॉलनी मधील हनुमान मंदिर येथील मैदान ओपनस्पेस विकसित करणे करिता “वैशिष्टपुर्ण निधी योजना” अंतर्गत 19 लक्ष 49 हजार 590 रुपये, श्री.वरखेडे ते केचे स्टिनींग वॉल व मेन रोड ते वरखेडे यांच्या घरापर्यंत डांबरीकरण करणे करिता 21 लक्ष 82 हजार 176 रुपये” या सर्व विकासकामांसाठी 57 लाख 59 हजार 489 रुपये निधीची तरतुद करुन देण्यात आला होता त्या अनुषंगाने काम पुर्ण झालेल्या संपूर्ण विकास कामाचा लोकार्पण सोहळा यावेळी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्याहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी लोकार्पण सोहळ्याला आमदार देवेंद्र भुयार, नगराध्यक्ष मेघना मडघे, नगरसेविका विद्या ढवळे, क्रांती चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश विघे, रुपेश मेश्राम, अंकुश घारड, राजेश पाटील, पंकज विधळे, पंडितराव देशमुख, हितेश साबळे, आशिष गेडाम, रुपेश वाळके, वैभव फुके, शरद कनेर, यांच्यासह मोर्शी शहरातील पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.