• Mon. Jun 5th, 2023

महाराष्‍ट्र विधानपरिषदेवर निर्वाचित झालेल्या सदस्यांना शपथ

    मुंबई, : महाराष्‍ट्र विधानपरिषदेवर विधानसभा सदस्यांद्वारे निर्वाचित झालेल्या दहा सदस्यांचा शपथविधी, प्रतिज्ञाग्रहण कार्यक्रम विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाला.

    दहा सदस्यांना शपथ

    नवनिर्वाचित सदस्य रामराजे नाईक-निंबाळकर, एकनाथ खडसे, प्रवीण दरेकर, प्रा. राम शिंदे, अशोक ऊर्फ भाई जगताप, प्रसाद लाड, उमा खापरे, आमश्या पाडवी, श्रीकांत भारतीय, सचिन अहिर यांनी आज विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. यावेळी विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, उपसचिव राजेश तारवी उपस्थित होते.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *