भारतीय जनसंचार संस्थेत मराठी पत्रकारिता प्रवेश परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 जुलै 2022

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय जन संचार संस्थेच्या(आयआयएमसी) मराठी पदव्युत्तर पदविका पत्रकारीता अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची मु़दत 25 जुलै 2022 पर्यंत वाढवून देण्यात आली आहे.

    भारतीय जनसंचार संस्थेचे संपूर्ण भारतात 6 केंद्र आहे. देशात या 6 क्रेंद्राद्वारे विविध अभ्यासक्रम शिकविले जातात. इंग्रजी पत्रकारिता, हिंदी पत्रकारिता, जाहिरात आणि जनसंपर्क, रेडिओ आणि टेलिव्हिजन पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया, ओडिया, मराठी, मल्याळम आणि उर्दू पत्रकारिता.

    त्यापैकी महाराष्ट्रा मध्ये अमरावती येथे पदव्युत्तर पदविका मराठी पत्रकारिता अभ्यासक्रम गेल्या 7 वर्षा पासून सुरु आहे. देशातील अनेक विध्यार्थी इथे प्रवेश घेतात आणि आपले भविष्य उज्वल करतात. पदव्युत्तर पदविका मराठी पत्रकारितेच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 जुलै 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे. प्रवेश परीक्षा 31 जुलै 2022 रोजी आयआयएमसी अमरावती द्वारे सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत घेतली जाईल.

    ऑनलाइन अर्ज iimc च्या अधिकृत वेबसाइट http://www.iimc.nic.in/ वर उपलब्ध आहेत.तरी ज्या विध्यार्थ्यांना प्रवेश करायचा आहे. त्यांनी आय आय एम सी च्या संकेतस्थळावर वर जाऊन आपली नोंदणी करून घायची आहे.संपूर्ण माहिती आय आय एम सी च्या संकेतस्थळावर वर उपलब्ध आहे. अधिक माहिती साठी ९४२२८५७०६०,९८८१३८८६४५ या मोबाईल नंबर वर संपर्क साधता येइल.