बापट चौक, नगर वाचनालय येथे अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : शनिवार दिनांक १६ जुलै,२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता अतिक्रमण विभागामार्फत यांनी राजकमल चौक ते जयस्‍तंभ चौक रोडवरील, बापट चौक, नगर वाचनालय रोडवरील अतिक्रमण निर्मुलनाची कार्यवाही करण्‍यात आली. बापट चौक, नगर वाचनालय रोड येथून सदर कार्यवाही सुरु करण्‍यात आली.

    राजकमल चौक ते जयस्‍तंभ चौक रोडवरील, बापट चौक, नगर वाचनालय रोडच्‍या दोन्‍ही बाजुंनी सदर अतिक्रमण निर्मुलन व अनधिकृत बांधकाम पाडण्‍याची कार्यवाही करण्‍यात आली. या कार्यवाही मध्‍ये वालकंपाऊंड, टिनाचे बांधकाम, पानठेले, अनधिकृत दुकाने, दुकानाचे शेड, दोन भंगार गोडाऊन, मुख्‍य रस्‍त्‍यावरील अतिक्रमण नष्‍ट करुन रोड व फुटपाथ मोकळे करण्‍यात आले. जेसीपीद्वारे अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही करण्‍यात आली. यावेळी अतिक्रमण पथक प्रमुख अजय बन्‍सेले, अतिक्रमण विभागाची टिम, झोन क्र.२ ची टिम व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.