बचत गटातील महिलांनी आय टी आय मधील प्रशिक्षण घेऊन कौशल्य कुशल व्हावे

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    * स्कुल कनेक्ट प्रवेश प्रोत्साहन अभियांनांतर्गत प्राचार्य मंगला देशमुख यांचे प्रतिपादन
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती आय टी आय च्या सभागृहात प्रवेश प्रोत्साहन अभियाना अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ, आय टी आय व विविध स्वयंसहाय्य बचत गटाच्या संयुक्त विद्यमाने महिलासाठी प्रथमच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

    आयटीआयच्या स्कूल कनेक्ट व प्रवेश प्रोत्साहन अभियानांतर्गत शहरी व ग्रामीण भागातील जास्तीत जास्त महिलांनी व तरुणींनी स्वयंरोजगाराच्या दृष्टीने आत्मनिर्भर होण्यासाठी आयटीआय मधील विविध व्यवसायामध्ये प्रवेश घेऊन प्रशिक्षणाच्या साह्याने तंत्र कुशल व्हावे व कौशल्य प्राप्त करावे. जेणेकरून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. हे समाजातील बदललेलं चित्र इतरांना प्रेरित करेल असा आशावाद माविम चे जिल्हा समन्वयक श्री सुनील सोसे यांनी उपस्थित बचत गटातील महिला व तरुणीपुढे व्यक्त केला.

    या मेळाव्याचे उदघाट्न मुख्य मार्गदर्शक श्री सुनील सोसे यांनी दीप प्रज्वलीत करून केले. अध्यक्षस्थानी आय टी आय च्या प्राचार्य सौं मंगला देशमुख ह्या होत्या तर प्रमुख उपस्थितीमध्ये राहाटगाव आयटीआयच्या प्राचार्य सो मनीषा गुढे, माविम चे सहाय्यक जिल्हा समन्वयक ऋषिकेश हायार, परिवर्तन लोकसंचालित साधन केंद्रच्या व्यवस्थापिका सौ. प्रीती भैसे,आय टी आय चे गटनिदेशक ठोके सर, पुंड सर, अलका देशमुख मॅडम आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

    अमरावती आय टी आय च्या प्राचार्य सौं मंगला देशमुख यांनी उपस्थित महिलांना आय टी आय च्या प्रवेश प्रोत्साहन अभियानाला सहकार्य करावे. असे आवाहन यावेळी केले.आपल्या कुटुंबातील,ग्रामीण भागातील,वस्तीमधील महिला व तरुणीनी मोठ्या संख्येने आय टी आय मध्ये प्रवेश घेऊन विविध व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊन कौशल्य प्राप्त करावे जेणेकरून भविष्यात स्वतः च्या पायावर उभे राहून स्वयंरोजगार करता येईल व माविम च्या सहकार्याने उद्योगधंद्यासाठी कर्जपुरवठा करून बचत गटाला आर्थिक सक्षम बनवता येईल. असेही यावेळी त्यांनी महिलांपुढे प्रतिपादन केले. राहटगाव आय टी आय च्या प्राचार्य सौं मनीषा गुढे, सौं प्रीती भैसे, ठोके सर, अलका देशमुख मॅडम यांनी या अभियानाबाबत बचत गटातील उपस्थित शेकडो महिलांना योग्य मार्गदर्शन केले. या मेळाव्याला आय टी आय चे कर्मचारी प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.मेळाव्याचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन सुरेन भांडे यांनी केले.