• Wed. Jun 7th, 2023

पदवीधर मतदार संघासाठी मतदार याद्यांचे 1 ऑक्टोबर पासून पुनरीक्षण

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाने दि. 5 सप्टेंबर 2016 च्या पत्रान्वये पदवीधर व शिक्षक मतदार संघाची मतदार याद्या तयार करण्याच्या संदर्भात सुधारित सर्वसमावेशक सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करावयाच्या आहेत. तसेच दि. 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत नाशिक व अमरावती विभागातील पदवीधर व औरंगाबाद, नागपूर व कोंकण विभागातील शिक्षक मतदार संघांसाठी मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला आहे.

    मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (3) अन्वये जाहीर सूचना प्रसिध्द करण्याचा दि. 1 ऑक्टोबर 2022 आहे. वर्तमानपत्रातील नोटीसीची प्रथम पुर्नप्रसिध्दी दि. 15 ऑक्टोबर 2022, वर्तमानपत्रातील नोटीसीची द्वितीय पुर्नप्रसिध्दी दि. 25 ऑक्टोबर 2022, नमूना 18 किंवा 19 द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम दि. 7 नोव्हेंबर 2022, हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई दि. 19 नोव्हेंबर 2022 आहे.

    प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी दि. 23 नोव्हेंबर 2022, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी दि. 23 नोव्हेंबर 2022, दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे दि. 25 डिसेंबर 2022, मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी दि. 30 डिसेंबर 2022 आहे.भारत निवडणुक आयोगाचे निर्देश व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सर्व संबंधितांना कळविण्यात यावे, असे संजय पवार, उप आयुक्त (सा.प्र.) अमरावती यांनी कळविले आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *