• Fri. Jun 9th, 2023

पथदर्शक परिवार आयोजित कवी संमेलन व प्रकाशन सोहळा संपन्न.

कविता पावसाच्या यात रसिक चिंब भिजले

पथदर्शक परिवार आयोजित ‘कविता पावसाच्या’ या विषयावर कविसंमेलनाचे आयोजन केलेले होते . शनिवार दिनांक 23जुलै 2022, वेळ दुपारी 1.30 मिनिटांनी स्थळ इंदुदीप सभागृह सिंधी (मेघे ), हायवे बायपास उड्डाणंपुल, शांतीनगर, वर्धा येथे संप्पन झाले.
कविसम्मेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर भूषण रामटेके, (जेष्ठ साहित्यिक), प्राचार्य, सुव्वालाल पाटणी महाविद्यालय, पुलगाव हे होते . कविसंमेलनाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक रसपाल शेंद्रे, हिंगणघाट, व प्रा. अभय दांडेकर, हिंगणघाट यांनी अतिशय बहारदारपणे केले.
निमंत्रित कवी म्हणून खालीलप्रमाणे कवी सहभागी झाले होते . पद्माकर अंबादे,( पाऊस ),नामदेव दखणे,(पाला वरची झोपडी ) डॉ. अन्वर अहमद सिद्दीकी, (बारिश )वसंतराव करोडे, सोपान दातार, प्रकाश कांबळे,(पाऊस ),प्रा. राजेश डभारे,(आला पाऊस गेला पाऊस ), सुरेश मेश्राम, (पाऊस ), कमलेश पाटील,(महापूर ),प्रकाश जिंदे,(पाऊस ), मनोहर मानवटकर,(जीवनाचे दुःख ),प्रशांत ढोले,(पहिला पाऊस )जगदीश भगत,(पाऊस ),मार्शल संजय ओरके(मी वाहतो पखाली), डॉ. शहाणाज (खरं तर पाऊस असा पडावा ), प्रा. अभय दांडेकर, (पाऊस गेल्यानंतर ), रसपाल शेंद्रे (पाऊस ), अध्यक्षीय कविता प्राचार्य डॉ. भूषण रामटेके यांनी (माझ्या मुलाची कविता )सादर केली. आज रसिकांनी पावसाच्या विविध रुपातील कविता ऐकल्या. गझल, अभंग, मुक्तछंद, गेय, इत्यादी कविता अनुभवास मिळाल्या. बाहेर पाऊस सुरु होता. सभागृहात कविता पावसाच्या यात रसिक चिंब चिंब भिजत होते.आभार प्रदर्शन प्रकाश जिंदे यांनी केले.
पथदर्शक आयोजित तिसरा अंकाचे प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अध्यक्ष म्हणून डॉ. निशांत बनसोड ( प्रा. शरीरक्रियाशास्त्र विभाग, महात्मा गांधी इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल साईसेईन्स, सेवाग्राम,हे आपल्या अध्यक्ष बोलत होते. ते म्हणाले “पथदर्शक हे समाजाला दिशा देण्याचे कार्य करेल.तुम्ही कोणत्या दिशेंने जाता हे महत्वाचे आहे.”प्रमुख अतिथी डॉ. लीना बनसोड, सहाय्यक प्राध्यापक, शरीररचना शास्त्र विभाग, श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ यांची उपस्थिती होती . त्या आपल्या भाषणात म्हणाल्या ‘पथदर्शक हे विचार पेरण्याचे काम करीत आहे.प्रस्तावना पथदर्शकचे संपादक जगदीश भगत यांनी केले.कवी, समीक्षक प्रशांत नामदेवराव ढोले यांचे राजस्तरीय समीक्षा ग्रंथ( आंबेडकरी जाणीवांचा अक्षरप्रकाश )याबद्दल मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. प्रकाशन सोहळ्याचे संचालन प्रा. डॉ. अरविंद पाटील यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने केले. आभार प्रकाश कांबळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय मोडक, शशिकांत थुल, अलोक रामटेके, सुनील रामटेके, उमेश गायकवाड, प्रशांत जारोंडे यांनी मेहनत घेतली.सर्वं कविचे स्वागत बुके देऊन करण्यात आले.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *