• Tue. Sep 19th, 2023

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा मेळाव्यात 246 उमेदवारांची विविध पदांवर निवड

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्यातर्फे आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 246 सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांची विविध पदांवर प्राथमिक निवड करण्यात आली, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी दिली.

    शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित मेळाव्याला औद्योगिक प्रशिक्षण सहायक संचालक नरेंद्र येते, प्राचार्य मंगला देशमुख, बीटीआयआरच्या प्राचार्य मनीषा गुढे, मार्गदर्शन अधिकारी वैशाली पवार आदी उपस्थित होते.या मेळाव्यात एकूण 324 उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहुन सहभाग नोंदविला. विभागाच्या https//rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणीची सुविधा देण्यात आली. ऑनलाईन नोंदणी शक्य न झालेल्या उमेदवारांना मेळाव्याच्या ठिकाणीच नोंदणीची सुविधा देण्यात आली.

    रोजगार मेळाव्यात सहभागी झालेल्या विविध कंपन्या

    मेळाव्यात औरंगाबादेतील धुत ट्रान्समिशन, अमरावतीच्या नवभारत फर्टिलायझर, गोल्डन फायबर, थिंजी एच आर सर्व्हिसेस ॲन्ड स्किल डेव्हलपमेंट, अभिनव, पीपीटीएस इंडिया, एस ई. सोल्युशन, टेक्नोक्राफ्ट आणि पुण्याची फोनिक्स इंटिग्रेटेड आदी कंपन्या सहभागी होत्या. श्रीमती पवार यांनी प्रास्ताविक, तर राजेश भांडे यांनी सूत्रसंचालन केले. श्रीमती गुढे यांनी आभार मानले.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,