- * अखेर कौडण्यपूरच्या त्या प्रभारी सचिवाची बदली, गावकऱ्यांनी बीडीओ व सभापतींकडे केली होती मागणी
- * प्रभारी सचिवाची अनियमितता व हलगर्जीपणामुळे गावकरी होते त्रस्त
अमरावती : विदर्भाची पुरातन राजधानी असलेल्या श्री क्षेत्र कौडण्यपूर येथे गेल्या तीन वर्षांपासून प्रभारी सचिव म्हणून प्रवीण पाचघरे हे ग्रामपंचायत चा कारभार सांभाळत होते. ज्यांच्याकडे चेनुष्ठा, पालवाडी व कौंडण्यपूर गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कौडण्यपूर, जुनी शिदवाडी, नवी शिदवाडी व वंडली अशी सहा गावे होती. त्यामुळे त्यांना एका ग्रामपंचायत ला आठवड्यातून २ दिवसच मिळत होते.
असे असताना त्यांच्या अनियमिततेमुळे गावकर्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. त्याचबरोबर अनेकदा त्यांना काही समस्येबाबत निवेदन देऊन सुद्धा सदर समस्येवर तीन-तीन महिने दखल घेतली जात नव्हती. त्यांच्या या हलगर्जीपणामुळे व उलट सुलट उत्तरामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे कौडण्यपूर येथे असलेले प्रभारी सचिव यांची बदली करून नियमित व पूर्ण वेळ सचिव देण्यात यावे, अशा प्रकारची मागणी १६ मार्च २०२२ रोजी ग्रामवासियांनी गटविकास अधिकारी चेतन जाधव व सभापती सौ. शिल्पाताई रविंद्रजी हांडे यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली होती. त्याची दखल घेत आता कौडण्यपूर येथे तब्बल तीन वर्षानंतर पूर्णवेळ व नियमित आणि स्वतंत्र सचिव म्हणून जी. एस. मांगुळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी अक्षय पुंडेकर, अमोल शेंडे, तंटामुक्ती अध्यक्ष अंकुश देऊळकर, दिनेशराव ठाकरे, रोशन भगत, दीपक केवदे, हितेश गोरडे, शुभम अर्मळ, विशाल गोहत्रे, शाहरुख शाह आदी उपस्थित होते. नवनियुक्त सचिव जी. एस. मांगुळकर यांनी पदभार घेताच गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.